Stopping by Woods on a Snowy Evening

Whose woods these are I think I know.
His house is in the village though;
He will not see me stopping here
To watch his woods fill up with snow.

कवी जंगलातून चालता चालता थांबलाय. विचार करतोय की हे जंगल कुणाचे आहे? मला कदाचित माहीत आहे. पण तो मालक तर दूर कुठेतरी रहातो. मी इथे थांबलोय ते तर त्याला कळणार नाही. (मला इथे कवी हा अतिशय एकाकी आहे, असे वाटते. धार्मिक वृत्तीच्या लोकांना कदाचित असे वाटेल की त्याला देवाची आठवण येत आहे, हे जंगल देवाच्या मालकीचे आहे वगैरे वगैरे.)

My little horse must think it queer
To stop without a farmhouse near
Between the woods and frozen lake
The darkest evening of the year.

माझा घोडा पण माझ्या इथे थांबण्याने अचंबित झाला आहे की मी इथे अचानक का थांबलो, आजूबाजूला एकही घर नसताना, सोबतीला फक्त गोठलेला तलाव आहे, अतिशय थंडीची भयाण रात्र आहे, तरीही कवी का थांबला आहे इथे? (पण मला हे निसर्गाचे शांत, एकाकी रूप आवडते, निसर्गाच्या सान्निध्यात, मला इथे एक प्रकारची शांतता मिळते)

He gives his harness bells a shake
To ask if there is some mistake.
The only other sound’s the sweep
Of easy wind and downy flake.

माझा घोडा माझ्या या अवचित वागण्याने गोंधळून गेला आहे. तो मान हलवून, त्याच्या गळ्यातल्या घंटा वाजवून मला विचारतोय की माझी काही चूक झाली आहे का? तू अचानक इथे का थांबलास? ( पण त्याला कसे कळणार की मला इथे निसर्गाच्या सान्निध्यात आवडते जिथे शांतता आहे, फक्त मंद असा वारा वहात आहे)

The woods are lovely, dark and deep,
But I have promises to keep,
And miles to go before I sleep,
And miles to go before I sleep.

कुणाला कसे कळणार की हा निसर्ग इतका सुंदर आहे कारण तो इतका शांत, एकाकी आणि धीरगंभीर आहे. मला या निसर्गासोबत अजून थोडा वेळ घालवायला आवडेल. पण काय करणार, माझ्यावर जबाबदाऱ्या आहेत त्यामुळे इच्छा असूनही मला इथे थांबता येणार नाही. मला आयुष्यात पुढे जावेच लागेल, माझी इच्छा असो वा नसो तरीही. पण माझी खात्री आहे की मला एकदा (कायमची) झोप लागली की या निसर्गाशी एकरूप होता येईल.

Sometimes, there is a mistake in this poem. Last paragraph is written as:
The woods are lovely, dark, and deep. (With Oxford comma)

Robert Frost meant to write:
The woods are lovely, dark and deep. (Without Oxford comma) He meant that the woods are lovely because they are dark and deep.

When Oxford comma is used, the comma changes the meaning to convey a meaning that the woods are lovely and dark and deep.

That’s not what Robert Frost intended.

https://crisiscribnotes.substack.com/p/the-oxford-comma-is-provocative-revered

Posted in मनातलं | Leave a comment

वजन

जे लोक जगण्यासाठी न खाता, खाण्यासाठीच जगतात आणि मग वजन वाढले की कमी करण्यासाठी जीवाचा आटापिटा करत बसतात, त्यांच्याबद्दल अजिबात सहानुभूती नाही. आयुष्यात सगळ्यात चांगली गोष्ट असेल तर ही आहे की प्रत्येकाला स्वतःचे वजन स्वतःलाच उचलावे लागते.

Posted in मनातलं | Leave a comment

धर्म

संदर्भ

विशिष्ट धर्म नाही पण मुळात धर्म ही संकल्पनाच मानवी समाजासाठी किती घातक आहे, हे मनुष्याला कळत नाहीये हे दुर्दैवी आहे.

Posted in मनातलं | Leave a comment

सच्चा लेखक

मुळात लेखक कुठल्याही सार्वजनिक माध्यमात का लिहितो ? >>
खाज आहे म्हणून. अनेक लेखक, उदा. ब्लॉगर किंवा सोशल मीडियावर लिहिणारे लिहितात, अगदी प्रसिद्धी किंवा पैसे मिळाले नाही तरीही.

प्रसिद्धी, पैसा हे हवे असतात, नाही असे नाही. पण मूळ उद्देश तो नाही. स्वतः ची कंड शमवणे हा आहे. (याचे कारण हे ही असू शकते की लेखन करणे बऱ्याचदा फुकट असते, त्याला पैसे पडत नाहीत).

माझ्या मते, जे हे स्पष्टपणे मान्य करतात ते जेन्युईन लेखक असतात. त्याच्यानंतर आम्ही प्रसिद्धी, पैसे मिळावे म्हणून लिहितो, असे मान्य करणारे. सर्वात शेवटी, आम्ही वाचकांसाठी लिहितो असे म्हणणारे, ते पक्के खोटारडे आणि भामटे.

Posted in मनातलं | Leave a comment

भारतीयांमध्ये कृतज्ञता नाहीये का?

भारतात जिथे तिथे गांधी, नेहरू यांची नावे दिसतात. त्यांच्या नावाने रस्ते, उद्याने, वेगवेगळी स्मारके, पुतळे, संस्था या सरकारी खर्चाने बांधल्या आहेत. महाराष्ट्रातपण छत्रपती शिवाजी, ठाकरे यांची नावे सगळीकडे दिसतात.

पण भारताचे खरे शिल्पकार जे आहेत, त्यांना भारतीय विसरलेत का? असा प्रश्न पडतो.

सुरुवात करुया भारतीय सैन्यापासून. सैन्याचे शौर्य आणि त्याचे कौतुक करणारी आर्मी. पण बांगलादेश स्वातंत्र्याचे शिल्पकार, आर्मीचे सर्वोच्च रँक असणारे फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ जेव्हा दिवंगत झाले, तेव्हा कुठे होते? ५ स्टारच्या या ऑफिसरच्या अंत्यविधीला राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, डिफेन्स मिनिस्टर, तिन्ही दलांचे (भूदल, नौदल, वायुदल) चीफ ऑफ स्टाफ, राज्याचे मुख्यमंत्री कुणीही हजर न्हवते. इतकेच नाही तर राष्ट्रीय दुखवटा पण जाहीर केला गेला नाही.

असेच दुसरे उदाहरण म्हणजे जे आर. डी. टाटा यांचे. त्यांच्यामुळे भारतात एअर इंडिया ही विमानसेवा सुरू झाली. नवी मुंबई विमानतळाला नाव कुणाचे द्यावे, या चर्चेत त्यांचे नाव पण सुचवले गेले होते. खरं तर फार पूर्वीच मुंबई विमानतळाला त्यांचे नाव द्यायला हवे होते. यावेळी ती चूक सुधारायची संधी होती, पण तसे होणार नाही याची हळहळ वाटते. नेहमीप्रमाणे राजकारणात जे.आर.डी. टाटा यांचे नाव मागे पडणार यात मलातरी शंका नाही. गांधी, नेहरू, शिवाजी, ठाकरे, इतर स्थानिक राजकारणी यांच्यापुढे फडतूस टाटांना कोण विचारतो?

Posted in मनातलं | Leave a comment

ग्राहक राजा, जागा हो

सध्या दिवसेंदिवस ग्राहकाची गळचेपी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याची थोडक्यात माहिती देण्यासाठी हा प्रपंच.

१. किंमती स्पष्ट आणि सुलभ पद्धतीने दाखवल्या जात नाहीत, खूप फसवाफसवी केली जाते. हे प्रकार विशेषतः ऑनलाईन खरेदीत जास्त दिसतात. शिपिंगला किती पैसे लागतील ते मुद्दाम सांगितले जात नाही वगैरे.
२. कुठलीही वस्तू किंवा सुविधा मालकी तत्त्वावर विकण्याऐवजी, भाड्याने विकली जाते. उदा. बरीचशी ई-पुस्तके. किण्डलवरील, तुम्ही विकत घेतलेली पुस्तके अ‍ॅमेझॉन त्यांच्या मर्जीनुसार उडवू शकते.
३. फक्त एकदाच माल विकण्याऐवजी subscription model ग्राहकाच्या गळ्यात मारले जाते. बर्‍याचदा हा प्रकार नकळत केला जातो.
४. हे subscription model ग्राहकाला सहजपणे रद्द करता येऊ नये, म्हणून त्याला जास्तीत जास्त त्रास दिला जातो. उदा. न्यूयॉर्क टाईम्स वृत्तपत्र.
५. ग्राहकाने विकत घेतलेली वस्तू त्याला स्वतःला किंवा इतरांकडून दुरुस्त करता येऊ नये म्हणून Right-to-repair ला विरोध केला जातो. उदा. अ‍ॅपल, जॉन डिअर (ट्रॅक्टर कंपनी)
६. Dark patterns वापरले जातात. उदा. अकाउंट सहजासहजी बंद करता येत नाही.
७. वस्तू विकत घेण्यापूर्वी तुलना करता येऊ नये म्हणून एकच प्रॉडक्ट वेगवेगळ्या नावाने विकले जातात किंवा छापील किमतीपेक्षा कमी किमतीत विकायला रिटेलर्सना बंदी केली जाते. बर्‍याच लक्झरी प्रॉडक्टसाठी हा प्रकार केला जातो.
८. खूपश्या टेक कंपन्यांनी, व्यक्तीबरोबर प्रत्यक्ष बोलून सपोर्ट देण्याचा मार्ग बंद केला आहे. फक्त ईमेलवरच उत्तर मिळते. खूप त्रास झाला तर ग्राहकाला सोशल मिडियाचा आधार घ्यावा लागतो आणि आरडाओरडा करून कंपनी मदत करेल याची वाट बघावी लागते.
९. बहुतेक सगळीकडे लवाद (arbitration) चाच पर्याय असतो, कंपनीला कोर्टात खेचता येत नाही.
१०. कंपन्या मात्र कुठलेही कारण न देता तुमचे अकाउंट बंद किंवा पूर्णपणे रद्द करू शकतात आणि त्याबद्दल कुणाकडेही दाद मागण्याचा पर्याय ग्राहकाला उपलब्ध नसतो. गूगल, अ‍ॅपल, फेसबुक, ई-बे, पेपाल (PayPal), स्ट्राईप (Stripe पेमेंट गेटवे), अ‍ॅमॅझॉन आणि अशा अनेक कंपन्यांनी हे उद्योग केले आहेत आणि अजूनही करतात.
११. आता काही कंपन्या ग्राहकांना “स्कोअर” देतात. जर तुमचा स्कोअर चांगला असेल तर तुम्हाला चांगली सर्व्हिस मिळते, नाही तर चांगली सर्व्हिस मिळत नाही उदा. तुम्हाला फोनवर मुद्दाम जास्त वेळ होल्डवर ठेवले जाते वगैरे.
१२. स्वतःच्या मर्जीने नियम बनवू शकतात आणि ग्राहकाला पटत नसूनही गरजेस्तव ते मान्य करावे लागतात. उदा. एक कंपनी आता भाडेकरूंना प्रत्यक्ष किल्ली देत नाही, फक्त मोबाईल अ‍ॅप वापरूनच प्रवेश मिळेल अशी जबरदस्ती करते. काही ठिकाणी Bio-metric (हाताचे ठसे, डोळे, Face recognition) इ. माहिती वापरावी लागते.

त्यामुळे कुठल्याही कंपनी बरोबर व्यवहार करताना वरील गोष्टींचा विचार नक्की करा.

Posted in मनातलं | Leave a comment

A Catch 22 Situation

Economy Paradox – The World Over

1A. If interest rate goes up : “How can the poor afford a house or a car ?”

1B. If rate comes down :
“How will elders earn interest from the bank, in their twilight years ?”

2A. If foreigners invest in our country : “They are taking away our wealth as profits/dividends”

2B. If domestic Co. invests outside : “Our wealth shifts for the development of outsiders”

3A. If tax rates are increased : “The Govt is robbing people”.

3B. If tax rates are lowered : “The Govt is trying to help the rich”.

4A. If GDP grows : “The Govt is working primarily for the big corporates”.

4B. If GDP contracts : “There is no job creation”.

5A. If currency strengthens : “Our exports get impacted”.

5B. If currency weakens : “Our import bill has gone up”.

6A. If Food prices go up : “Masses are suffering”.

6B. If Food prices come down : “The farmers are suffering”.

7A. If stock market comes down : “The economy is in a mess”

7B. If stock market goes up : “Its not a true measure of economy; only corporates are being supported”.

8A. If Corporate tax rates are increased : “Govt is penalizing private enterprise”.

8B. If Corporate tax rates are cut : “the Govt is only trying to boost the profitability of corporates”.

Moral of the above contradictions :
Heads I win, Tails U lose
😄😄

Posted in मनातलं | Leave a comment

ठिगळ

माझ्या बहिणीचे लग्न झाल्यानंतर मी तिच्या विवाहाचे प्रमाणपत्र आणायला सरकारी ऑफिसात गेलो होतो. समोर ५० च्या आसपास वयाचे गृहस्थ होते. नेहमीच्या अनुभवावरून मी चहापाण्याची चौकशी केली. तर ते मला म्हणाले, “आम्ही लग्नाच्या वेळी आणि मयताच्या वेळी पैसे घेत नाही.” हे ऐकुन मी थक्कच झालो. पण तरी खात्री करण्यासाठी परत विचारले की अहो, फूल ना फुलाची पाकळी समजून काही पाहिजे तर सांगा, तर मला म्हणाले “नाही, काही नको. ते आमचं प्रिन्सिपल आहे.” 🙂 नंतर १५ मिनिटात त्यांनी माझे काम केले.

अजून १ थोडासा वेगळा अनुभव. बऱ्याच वर्षांपूर्वी मी फ्लॅट विकला, तेव्हा रजिस्ट्रारच्या ऑफिसात गेलो होतो. १ एजंट माझं काम करणार होता, म्हणून मी तिथे उभा होतो. तेव्हा १ गरीब बाई हमसून हमसून रडताना दिसली. ती म्हणत होती “काय ओ साएब, माझं काम कराना. आता १० वेळा आले इथे. दरवेळी म्हणता, हा कागुद आणा, मग तो कागुद आणा. मला बदलापूरवरून यावं लागतं. मी भाजी विकते, माझा खाडा होतो, रातच्याला खायला कसं मिळणार…” वगैरे वगैरे. तिच्या बरोबर १ लहान मुलगा होता, तो बिचारा भेदरून इकडेतिकडे बघत होता.

म्हणून मी त्या क्लार्कला म्हणालो, “अहो, जाऊ द्या ना, गरीब बाई आहे, करून टाका तिचं काम.” तर मला म्हणाला “अहो साहेब, तुम्हाला काय सांगू. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. मला दिसतंय, ती गरीब आहे. तिनं तर रेल्वेचं तिकिट पण काढलं नसणारं आहे, तेव्हडे पण पैसे नाहीत तिच्याकडे. पण मी काय करु? मी तिचं काम केलं तर साहेब बोलणार, ह्यानं काम केलं आणि मला पैसे दिले नाहीत, म्हणजे माझे पैसे खाल्ले. आता मी तिच्यासाठी स्वतःच्या खिशातून तर पैसे देऊ शकत नाही ना? तुम्ही सांगा, मी बरोबर की चूक?” मला काय बोलावे ते कळेना. मी १००० रुपये त्याला दिले आणि सांगितलं की तिचं काम करा. त्या क्लार्कने तिला बोलवून तिचं काम केलं, तर तिने अक्षरशः त्या क्लार्कचे पाय धरले. तिला काही माहित नाही, की त्याचे मत का बदलले, पण मुद्दा तो नाही.

आज इतक्या वर्षानंतर पण मला तो प्रसंग जसाच्या तसा आठवतो. त्या लहान मुलाचा केविलवाणा चेहरा दिसतो. मी बरोबर केलं की चूक, मला माहीत नाही. जे केलं ते स्वतःसाठी, स्वतःच्या समाधानासाठी केलं. पण एक विचार मात्र मनात नक्की येतो की आकाशचं जर फाटलंय, तर मी तरी ठिगळं कुठे कुठे लावणार?

Posted in मनातलं | Leave a comment

What I learned as I grew old

1. In the end, nothing matters. You are born alone and you die alone. In pain, you suffer alone. Take care of your health.
2. You yourself are responsible for your own happiness. A fine wine with dinner is just as important as the dinner itself.
3. It is a lot easier to find happiness in small things in life, smell of a rose, window seat in a train, enjoying an ice cream on a sunny day, sending a thank you note, nice music.
4. Time is more valuable than money. Money can be earned again, but time spent is gone forever, so use your time wisely
5. Smiling and saying thank you more often helps. Slowing down also helps.

6. Keep learning and be curious. Always.
7. There can be more than one way to success. Success is how you define it.

8. Money can buy you happiness, but happiness cannot buy you money.
9. Never forget if someone insults you or someone does any favor for you.

10. No one ever said on their deathbed, “I wish I spent more time in the office”.

Posted in मनातलं | Leave a comment

जर पैसे आणि कौतुक दोन्हीची गरज नसेल तर…

समजा तुम्ही आयुष्यात अगदी तृप्त असाल तर काय कराल, हा प्रश्न मला नेहमी पडतो. म्हणजे मनासारखे जगायला काय कराल? बहुतेक वेळा आपण बऱ्याच गोष्टी करतो त्या पैसे मिळतात म्हणून किंवा बॉस अथवा इतर कुणाकडून कौतुक मिळावे म्हणून. पण समजा तुमच्याकडे पुरेसा किंबहुना गरजेपेक्षा जास्तच पैसा आहे, आणि तुम्हाला कुणाच्या कौतुकाची अपेक्षाही नाही किंवा तशी गरजही भासत नाही, मग तुम्ही कसे जगाल? नवीन काय कराल किंवा काय करायचे बंद कराल?

म्हणजे लोकं म्हणतात ना की थू तुझ्या जिंदगीवर, तू नेहमी बॉसची चाकरी केलीस, मान खाली घालून फक्त काम केलेस, तू काय केलेस तुझ्या आयुष्यात? पण माझा प्रश्न नेमका उलटा आहे. समजा भरपेट जेवण करून तृप्त होऊन तुम्ही छान झोप काढली आहे. मग उठल्यावर कसे प्रसन्न वाटते. असे जर आयुष्य गेले असेल आणि आता निवृत्त आयुष्य पण सुखात जात असेल, तर मग काय करावे? म्हणजे नुसतं सोफ्यावर बसून टीव्ही तरी किती बघणार? पुढे काय? छ्या, तुम्ही आयुष्य जगलाच नाहीत, असं कुणी म्हटलं की उत्तर काय देणार?

Posted in मनातलं | Leave a comment