नानाबरोबर भेट

मी १९९९ साली “पुरुष” नाटकाच्या वेळी परदेशात नाना पाटेकरला बॅकस्टेजला भेटलो होतो. योगायोगाने आजुबाजूला कलाकारांव्यतिरिक्त कुणीही मराठी न्हवते, नानालाही वेळ होता, त्यामुळे जवळपास ४० मिनिटे आमच्या खूप गप्पा झाल्या. बाकी त्याची इमेज कशीही असो, पण अगदी मनमोकळा माणूस, मराठीत बोलत होता. मिरचीचे आइस्क्रीम मिळते आणि छान असते, हे त्यानेच सांगितले. सिनेमात किती पैसे मिळतात (प्रत्यक्ष आकडा सांगितला), पण जगायला ओंजळभर पुरतात, उरलेले स्वतःच्या उपयोगाचे नाहीत, परदेशातील “पुरुष” नाटकाचा पैसा बाबा आमटे यांच्या आश्रमाला देणार असे म्हणाला. इतर बरेच काही पर्सनल विचार पण. गप्पांच्या नादात फोटो काढला नाही, स्वाक्षरी घेतली नाही तरी छान वाटले. पण याचा एक परिणाम झाला मात्र. नंतर कळले की हे कलाकार/मोठी माणसे पण तुमच्या आमच्यासारखीच. त्यानंतर मात्र कुणा प्रसिद्ध व्यक्तीला मुद्दाम भेटायचे कधीच कौतुक उरले नाही.

Posted in मनातलं | Leave a comment

चेहरा

प्रत्येक व्यक्तीचे ३ चेहरे असतात. १ जो बाहेरच्या जगाला दिसतो, दुसरा जो फक्त जवळच्या व्यक्तींना दिसतो आणि तिसरा जो फक्त तुम्हाला माहिती असतो. खरं तर दुसऱ्या चेहऱ्यात पण अनेक कप्पे असतात, बायकोला एक कप्पा माहीत असतो, मित्रांना दुसरा, नातेवाईकांना तिसरा. बऱ्याचदा चेहरा एकच असला तरीही आतल्या कप्प्यांमध्ये संपूर्णपणे देवाणघेवाण होत नाही. तात्पर्य काय तर या वेगवेगळ्या चेहऱ्यांनी एकमेकांना न भेटणे हे चांगले असते.

Posted in मनातलं | Leave a comment

अंतिम सत्य

Generally what you like is either fattening, too expensive, not your size or married to someone else!!हेच आयुष्यातलं अंतिम सत्य!

Fiche bliain ag fás,
Fiche bliain faoi bhláth,
Fiche bliain ag meath
Agus fiche bliain gur cuma ann no as.

“Twenty years growing,

Twenty years in bloom,

Twenty years in decline,

And twenty years when it makes no difference if you’re there or gone.”

Posted in मनातलं | Leave a comment

अफरातफर

आज मला HDFC बँकेतून फोन आला होता. मला विचारले की तुमच्या खात्यातून अमूक अमूक रकमेचे ट्रान्सॅक्शन झाले आहे, ते तुम्ही केले का? मी नाही म्हणालो. मग त्या बाईने मधाळ आवाजात सांगितले की तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी सिक्युरिटी डिपार्टमेंट मध्ये आहे आणि तुमच्या अकाउंटची काळजी घेणे माझे काम आहे. मी तुम्हाला एक कोड पाठवते, तो तुम्ही verification साठी सांगा, मग अकाउंट सिक्युरिटी वाढवते. मी म्हणालो ठीक आहे. मला टेक्स्ट आला ५६३९५०, मी तिला सांगितला ३९४७२६. तिने तिच्या सिस्टीममध्ये टाकला, पण म्हणे चालत नाही. मी म्हणालो परत पाठव. परत सांगितला. परत चालला नाही. मी म्हणालो चष्मा लाऊन येतो. एकंदरीत ३ वेळा कोड चालला नाही, मग तिला कळले. मला शिव्या देत म्हणाली की तुमचे अकाउंट फ्रीज करीन मी. उगीच फालतूपणा करू नका. मी म्हणालो की सुरुवात तर तुम्हीच केली, तर तिने फोनच आदळला. एकंदरीत १५ मिनिटं चांगली मजेत गेली.

Posted in मनातलं | Leave a comment

शाळेतली आठवण

माझ्या शाळेत केटी बिलिमोरिया नावाची पारसी शिक्षिका होती. निव्वळ इंग्रजी अक्षरे वापरून तिच्यावर केलेली कविता तेव्हा मुलांमध्ये प्रसिद्ध होती. आज सहज आठवले, म्हणून ती तुम्हाला सांगतो.

K T B D P T T

P T P T K T T

M B D P Y K

B D C Y G Y K

Posted in मनातलं | Tagged | Leave a comment

शशक २ – आनंद

शाळेच्या दहाव्या रियुनियनला समीर भेटला मोनिकाला.
त्याच्या आवडीची चॉकलेट्स खास त्याच्यासाठी तिने स्वतःच्या हाताने बनवली होती.
चॉकलेट्स चघळत त्याने गप्पांना सुरुवात केली, जुन्या आठवणीना उजाळा मिळाला. पहिलं प्रेम होतं त्याचं. अजूनही ती तितकीच सुंदर दिसत होती, जास्तच सुंदर.
मोनिका, मी अजूनही तुझी वाट बघतोय.
ते शक्य नाही, ती ठामपणे म्हणाली.
पण का? तशीही तू एकटीच आहेस.
नाही, ती तुला नाकारले म्हणून गुंड पाठवून माझ्या नवऱ्याचा खून केलास तू, तेपण मी प्रेग्नण्ट असतानाच. मला वाटले नव्हते, तू कधी असा वागशील!
जाउ दे जुन्या गोष्टी. आता तरी माझी हो, आनंदात रहाशील. तो पुटपुटला.
स्लो पॉइजनची चॉकलेट्स तू खाल्लीस, मी आनंदित झाल्ये कधीच.

Posted in मनातलं | Tagged | Leave a comment

शशक १ – सुपारी

शाळेच्या २५ व्या रियुनियनला समीर पुन्हा भेटला मोनिकाला. त्याला बघताच तिचे जुने प्रेम उफाळून आले आणि तिने विस्मयचकीत नजरेने त्याच्याकडे बघितले. अजूनही तसाच चिकना होता तो, शिवाय आतातर प्रख्यात बिझनेसमॅन. आता मात्र त्याला काबीज करणारच माझ्यासाठी. तिच्या डोक्यात प्लॅन सुरू झाला त्याच्या बायकोचा काटा काढायचा. पॅरोलवर सुटलेल्या मन्याला सुपारी दिली तिने, २ लाखाची.
चार दिवसांनी मन्या आला मोनिकाकडे.
मी गेलो होतो समीरच्या बंगल्यावर. काम झालंय पण एक प्रॉब्लेम आला वाटेत.
काय झालं?
मी तिला गोळी मारली तितक्यात तिचा नवरा आला रूममध्ये. त्याने बघितलं मला.
अरे मूर्खा, म्हणजे तू आणि मी आता जाणार जेलमध्ये!!
काळजी नको मॅडम, मी त्याला पण टपकवलाय.

Posted in मनातलं | Tagged | Leave a comment

स्वर्ग

यमराज : बेटा तू पाप – पुण्य दोन्ही केले आहेस, यासाठी तुला स्वर्गातच नरक मिळेल….

छोटू : ते कसं काय……

यमराज : रोज रात्री तुला दोन ग्लास दारू मिळेल, आणि एक अप्सरा मिळेल….

छोटू : हे तर स्वर्गच स्वर्ग आहे….

यमराज : त्या ग्लासाला भोक असेल….
परंतु अप्सरेला नाही….😟😟😟😟

Posted in मनातलं | Leave a comment

संदर्भ ग्रंथ

मायबोलीकरांच्या सोईसाठी नवीन संदर्भ ग्रंथ बनवायचा विचार आहे. कमीत कमी कष्टात, कॉपीपेस्टचा फायदा करून घ्या.
ऑऑ = ऑलिव्ह ऑइल
हॉडॉ = हॉट डॉग
मावे = मायक्रोवेव्ह
पुपो = पुरण पोळी
कोपू = कोल्हापूर

फोभा = फोडणीचा भात

मुडाखि = मुगाच्या डाळीची खिचडी

गबामो = गणपती बाप्पा मोरया
या ग्रंथात अजून भर घालावी अशी नम्र विनंती. _/|\_

Posted in मनातलं | Leave a comment

मिनिमॅलिझम

माझ्या मते मिनिमॅलिझम हे एक फॅड आहे. पैसे असतील, परवडत असेल आणि आवड असेल तर जरूर नव्या गोष्टी विकत घेऊन त्यांचा उपभोग घ्यावा. (म्हणजे उपलब्ध रिसोर्स वापरावेत, नुसते गोळा करून ठेऊ नयेत.) मात्र enough (पुरेसे) किती, needs vs wants (गरज vs चैन) ते कळले पाहिजे. मी या मताचा आहे. परवडत असून आणि आवड असूनही मिनिमॅलिझमच्या नावाखाली मन मारून जगणे मलातरी आवडत नाही. परवडत नसेल किंवा आवडत नसेल तर लोक तसेही लोक मर्यादित गरजांमध्ये जगतातच, त्यासाठी मिनिमॅलिस्ट व्हायची गरज नाही.

Optimum utilization of any resource is the most critical point, not elimination of resources. जगातील कुठलाही रिसोर्स Reduce, Reuse, Recycle या तत्त्वाने वापरला की बस, मग ते रिसोर्सेस म्हणजे घरातील भांडीकुंडी, कपडे असोत किंवा निसर्गातील ऑईल, पाणी असोत.

गंमत म्हणजे आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा रिसोर्स म्हणजे वेळ. पण दुर्दैवाने त्याचा विचार करताना कुणीच दिसत नाही.

Posted in मनातलं | Tagged | Leave a comment