आत्ताच ऐसीअक्षरेवर स्वमग्नता एकलकोंडेकर या लेखिकेचा लेख वाचला आणि मग तिने लिहिलेले सगळे लेख वाचले. लेखिकेने ऑटिझम, म्हणजे स्वमग्नता या विषयावर लेख लिहिले आहेत. तिचा मुलगा हा स्वमग्न आहे. लेख चांगले माहितीपूर्ण आहेत. प्रतिक्रियांमध्ये लोकांनी तिचे कौतुक केले आहे. पण माझे विचार इतरांपेक्षा जरा वेगळे आहेत.
सर्वप्रथम माझ्या लक्षात आले की या लेखिकेने स्वमग्नता या एकाच विषयावर ९ लेख लिहिले आहेत. बाकी कशावरही १ ओळसुद्धा लिहिली नाही. “मी Mother Warrior आहे.” असे ती म्हणते.
तिच्या मुलाला स्वमग्नता आहे. ही नक्कीच वाईट गोष्ट आहे. But it is fait accompli. त्यामुळे तिला सहानुभुती दाखवण्याखेरीज आम्ही काय करणार? माझ्या बॉसची दोन्ही मुले स्वमग्न आहेत, पण तो कधीही तसे जाणवू देत नाही. मग लेखिकेचा मुलगा त्यांच्यापेक्षा काही फार वेगळा नाहीये. आणि स्वमग्नतेबद्दल ९ लेख ऐसीअक्षरेवर लिहिण्याचा हेतू मला काही कळला नाही. उद्या “अंध लोकांनी त्यांच्या रोजच्या जीवनात इंटरनेट कसे वापरावे ” असे लेख मी जर अंध लोकांच्या फोरमवर लिहिले तर एकवेळ लोक समजून घेतील, पण असे ९ लेख ऐसीअक्षरेवर लिहिले तर त्याला काही अर्थ आहे का? त्यामुळे मलातरी एकंदरीत हा स्वकौतुक करण्याचा प्रकार वाटला.
मीच ती स्वमग्नता एकलकोंडेकर किंवा मदर वोरिअर. मी दिलगीर आहे, तुम्हाला माझ्या लेखांचा इतका त्रास झाला त्याबद्दल.
मुलाला ओटीझम आहे, यात कौतुक करून घेण्यासारखे काय आहे सांगितले तर बरे होईल.
माझ्या लेखांचा उद्देश, मला जे माहीत आहे ते लोकांपर्यंत पोचवणे, जितकं शक्य होईल तितका अवेअरनेस वाढवणे तसेच मी स्वत: कुठेतरी व्यक्त होणे हा आहे. तो उद्देश तुमच्यापर्यंत पोचू शकला नाही याबद्दल वाईट वाटले.