आज एक गंमत झाली. लायब्ररीतून बाहेर पडलो तर एका बाईने मला थांबवून ती म्हणाली “Sir, I really liked your sweater. It is very elegant. I really don’t like those ugly Christmas sweaters.”
मी तिला म्हटले “Thank you. I will convey your praise to my wife because she selected this for me.”
त्यावर ती म्हणाली “Your wife made a very good choice.”
त्याच्यावर मी हसून तिला म्हणालो “Of course she did. After all, she chose me.”
आणि मग आम्ही दोघेपण मनापासून हसलो.
सांगायचा मुद्दा काय तर की बायकोने कुठलीही गोष्ट पसंत केली तर फारतर, मला इतकीशी आवडली नाही, असे म्हणा. पण तुझा चॉइस चांगला नाही, असे चुकूनपण म्हणू नका. कारण तुम्ही स्वतः पण तिचाच एक चॉइस आहात.