About

मी आहे एक सामान्य प्राणी. तुम्हाला आर. के. लक्ष्मणचा “कॉमन मॅन” माहीत असेल ना, म्हणजे अगदी तस्साच. अंगात काही विशेष गुण नसलेला, ऑफिसात पाट्या टाकून झाल्या की पगाराची वाट बघणारा, बसमध्ये खिडकीजवळ जागा मिळाली की स्वर्ग मिळाल्याचा आनंद होणारा, वर्षातून एकदा LTA घेऊन कुठेतरी सहल करणारा आणि त्या आठवणींवर जगणारा १ सरळ साधा जीव.

रोजच्या या रहाटगाडग्यात जगताना मनात अनेक विचार येतात, पण ते सगळे कोणाला स्पष्ट असे सांगता येत नाहीत, मनातल्या खर्‍याखुर्‍या भावना जाहीर करता येत नाहीत. म्हणून हा प्रपंच.

इथे मी माझे स्पष्ट मत लिहिणार आहे. काहीही न लपवता. काही विचार तुमच्या विचारांसारखे असतील, काही नसतील. काही तुम्हाला पटतील, काही नाही पटणार. पण १ मात्र नक्की, आपल्याला विचारांची देवाणघेवाण तरी करता येईल.

फक्त १ महत्वाचे म्हणजे, मी कोण आहे हे यदाकदाचित तुम्हाला कळले तर ते गुपित फक्त तुमच्याकडेच ठेवा. मुखवट्यामागे चेहरा कोणाचा आहे, ते कळले की स्पष्ट बोलण्यावर मर्यादा येते. धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.