तुम्ही इतकी सारी पुस्तकं का वाचता?
लहानपणापासून लागलेली आवड आणि सवय यामुळे.
काही विशिष्ट पुस्तकं वाचून त्रास होत नाही का? अशा अस्वस्थेतून तुम्ही बाहेर कसे येता? की अस्वस्थ राहणे पसंत करता?
नाही, अजिबात त्रास होत नाही.
पुस्तकं वाचणयसाठी वेळ कसा काय काढू शकता? पोटापाण्याच्या चिंता मिटल्याहेत का?
वेळ मिळत नसेल तर काढावा लागतो. रात्री उशीरापर्यंत जागून वाचन करायची सवय आहे. मी फारसा TV बघत नाही, त्यामुळे वेळ मिळतो. शिवाय मला प्रत्येक वर्षी ६ आठवडे सुट्टी मिळते, शनिवार/रविवार शिवाय २ आठवड्यांनी शुक्रवारी सुट्टी मिळते. भरपूर वेळ असतो.
आपल्या मूलभूत गरजांवर नियंत्रण ठेवता, की त्या भागवण्याइतकी संपत्ती तुमची कमावून झालिये?
हो. मुळात गरजा कमीच आहेत. मरेपर्यंत त्या पूर्ण होउनही संपत्ती उरेल, त्यामुळे ती काळजी नाही.
पुस्तकं वाचल्यानंतर त्याचं नक्की काय करता? स्वतःजवळ ठेवत असाल तर नंतर पुन्हा ती वाचून होतात का? की पुन्हा वाचनाच्या सर्क्युलेशन मध्ये यावीत म्हणून मुद्दम कुणाला वाचायला देउन टाकता, किंवा विकून टाकता?
मी DRM असलेली eBooks वाचत नाही. त्यामुळे बहुतेक वेळा कागदावरच छापलेली पुस्तके वाचतो. जर पुस्तक लायब्ररीमध्ये मिळत असेल, तर तिथून आणतो, नाहीतर विकत घेतो.
पुस्तक वाचून झाले की GoodReads मध्ये त्याचे वर्गीकरण करतो. (५ स्टार = स्वतःच्या संग्रहात ठेवण्यासारखे आणि मित्रांना भेट देण्यालायक. ४ स्टार = वाचायला चांगले. परत वाचावेसे वाटू शकेल. ३ स्टार = एकदा वाचायला ठीक. विकत घेण्यापेक्षा लायब्ररीतून आणलेले बरे. २ स्टार = बकवास. पैसे वाया गेले. १ स्टार = फुकट दिले तरी पुन्हा वाचणार नाही.)
विकत घेतलेले पुस्तक वाचून झाले, की स्वतःच्या संग्रहात ठेवण्यालायक नसेल तर लायब्ररीला देतो.
तुमच्यापैकी कुणाला आपण काही उत्तम , भरपूर कंटेंट असलेलं, अगदि स्वतंत्र पुस्तक म्हणून प्रकाशित होइल असं लिहावं असं वाटत नाही का?
वाचन आणि लेखन हे वेगवेगळे पैलू आहेत. पुस्तक लिहिता येईल इतपत ज्ञान मला कुठल्याच विषयात नाही. शिवाय लेखनाचा पिंडपण नाही. त्यामुळे स्वतःचे पुस्तक कधी प्रकाशित होईल, असे वाटत नाही.