कॉलेज शिक्षण झाल्यावर मी एस्पेरांतो शिकण्याचा प्रयत्न केला होता. मला आठवतयं की त्याचे ऑफिस कलकत्ता किंवा पुण्याला होते. तिथे पत्र पाठवून पुस्तक मागवले. तेव्हा दादरला १ गृहस्थ राहायचे, ज्यांना एस्पेरांतो बोलता येत असे, तिथे मी ३-४ वेळा जाऊन आलो. (खूपसे शब्द ‘ओ’ने संपायचे, मला बोंगाली शिकतोय की काय असं वाटायचं). पण मराठी/इंग्रजी => एस्पेरांतो => मराठी असं translation करण्यातच माझा जास्त वेळ जायचा. मनात आलं, जर भाषेचा मूळ उद्देश माझे विचार तुमच्यापर्यंत पोचवणे हा आहे, तर हा इतका खटाटोप का?
शिवाय तेव्हा माझ्याशी एस्पेरांतो बोलायला अजून कोणी न्हवते. एस्पेरांतोचा मला आयुष्यात काही उपयोग होईल का, अशी शंका आली. त्यामुळे मी चक्क प्रोग्रामींगची भाषा शिकायला लागलो. (याचा अजून १ फायदा म्हणजे चूक झाली की कॉम्प्यूटर लगेच चूक झाली आहे, हे सांगायचा पण). छोटेछोटे प्रोग्राम लिहून ते चालले, की अजून थोडा उत्साह पण यायचा.
हौस म्हणून भाषा शिकण्याचा प्रयत्न करून झाला, त्यातून भलतेच शिकलो. (पण ज्याचा मला आनंद मिळाला). माझे स्पष्ट मत आहे की भाषेचा मूळ उद्देश म्ह्णजे इतरांबरोबर विचारांची देवाणघेवाण (communication with others). त्यासाठी विशिष्ट भाषा दोघांना यायलाच हवी असं काही नाही. दुसरं म्हणजे आयुष्यात पुढे त्या भाषेचा काय उपयोग आहे का? त्यामुळे यापुढे शिकायचेच झाले, तर मी स्पॅनिश किंवा चायनीज शिकेन; संस्कृत किंवा एस्पेरांतो नाही.