भाषा

संदर्भ

डॉ कुमार यांचे दोन्ही लेख वाचले. आवडले, पण माझ्या मनात नक्की काय विचार आले ते लिहितो.
फार पूर्वी GRE परीक्षेची तयारी करताना २-३ हजार शब्द पाठ केले होते ते आठवले. त्या शब्दांचा प्रत्यक्ष आयुष्यात फार क्वचितच वापर झाला, Dictionary ला Lexicon हा प्रतिशब्द आहे हे माहीत असले किंवा नसले तरी जीवनात फारसा फरक पडत नाही, पण उपयोग काय तर परिक्षेत फायदा होतो. स्पेलिंग-बी सारख्या परीक्षा तशाच आणि कोडी सोडवायचा हा प्रकार पण काहीसा तसाच वाटला. ५०००, मग १०,००० मग २०,००० शब्द माहीत झाले की कोडी सोडवता येणार. ते पण बहुतेक वेळा, १००% नाही कारण मग एखादे वेळी   floccinaucinihilipilification असा क्लिष्ट शब्द (The action or habit of estimating something as worthless) पण शब्दकोड्यात येऊ शकतो.

माझ्या मते, मुळात भाषेचे उद्दिष्ट म्हणजे आपले म्हणणे समोरच्या व्यक्तीला समजले पाहिजे. दुसरे मत म्हणजे भाषा जितकी साधी, सरळ असेल तितकी ती समजायला सोपी पडते. त्यानंतर माझे मत आहे की सतराशे साठ गोष्टी माहीत करून घ्यायची नेहमीच गरज नसते. एस्किमो लोक बर्फ़ाला २७ प्रकारे संबोधन करतात असे कुठेतरी वाचले होते. त्यांची ती कदाचित गरज असेल (बर्फ भुसभुशीत आहे की घट्ट आहे की ठिसूळ आहे वगैरे) पण म्हणून आपल्याला त्या २७ स्वतंत्र शब्दांची गरज आहे का? श्री. शशी थरूर यांच्यासारखे इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवण्याची खरच गरज आहे का? हा कधीतरी विचार केला पाहिजे. महत्वाचे म्हणजे केवळ आपली शब्दसंपदा वाढल्याने आपले ज्ञान वाढणार आहे का? Richard Feynman – Names Don’t Constitute Knowledge हा व्हिडिओ आठवला.
आणि माझ्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचे म्हणजे आपल्याकडे या आयुष्यात लिमिटेड वेळ असतो. तो आवडीच्या गोष्टीत घालवावा असे माझे मत आहे. आता आंतरजालामुळे प्रतिशब्द शोधणे खूप सोपे झाले आहे. मला उर्दू येत नाही, पण ही कविता समजायला अडचण आली नाही. पण त्याच्यासाठी मी उर्दू शिकण्यात वेळ वाया घालवत नाही.

अर्थात हौसेला मोल नसते. तुम्हाला शब्दकोडे  सोडवून आनंद मिळत असेल तर मग उत्तमच. त्यामुळे तुम्ही शब्दकोडे सोडवता, त्यातून तुम्हाला आनंद मिळतो ही फारच छान गोष्ट आहे. तुम्हाला शुभेच्छा.

आजच्या घडीला साधारण ६९०० भाषा अस्तित्वात आहेत, Experts predict that even in a conservative scenario, about half of today’s languages will become extinct within the next 50 to 100 years.
भाषा नष्ट होणे ही काही नवी गोष्ट नाही. आजवर अनेक भाषा नष्ट झाल्या आहेत.
पुढील ५०० ते १००० वर्षात कदाचित जेमतेम १०० भाषा टिकतील. गंमत या गोष्टीची वाटते की ज्या भाषा आता नष्ट होणार आहेत किंवा नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत त्यांचा अभ्यास का केला जातो? आणि केवळ अभ्यासचं न्हवे तर ती भाषा (उदा. संस्कृत) टिकून राहावी म्हणून आटापिटा का केला जातो? 
मला तरी हा प्रश्न अधिक रोचक वाटतो.

This entry was posted in मनातलं and tagged . Bookmark the permalink.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.