मराठी साहित्यातील वाड्ःमयचौर्य (plagiarism)

माझे मराठी लेखन कुणीतरी चोरुन स्वत:च्या वेबसाईटवर टाकले म्हणून टाहो फोडणारे खूप जण दिसतात. मला कळत नाही की जर लेखन हा तुमच्या पोटापाण्याचा व्यवसाय नसेल तर मुळात जिथेतिथे काॅपीराईटचा अट्टाहास कशाला? मूळ लेखक Creative Commons सारखे लायसन्स का वापरत नाही?

मुळात ब्रँडेड प्रॉडक्टचे डुप्लिकेट बनवायची अख्खी इंडस्ट्री उभी आहे. त्याचे काही करू शकले नाहीत अजून. त्याच्यापुढे तुमच्या दीडदमडीच्या लेखाची काय किंमत?

स्वतःच्या लेखनाच्या प्रेमात पडलेल्यांनी आणि त्याची चोरी होईल या काळजीत पडलेल्यांनी Who stole my story? हा लेख आणि हा लेख व त्यावरील प्रतिक्रिया जरा वाचाव्यात. हल्ली उत्तम दर्जाचे लेखन आंतरजालावर अनेक जण स्वतःहून फुकटात उपलब्ध करून देतात. त्यामुळे आपण जगावेगळे काहीतरी फार भारी लिहून जगप्रसिद्ध होऊ आणि लाखो रुपये कमवू, या भ्रमातून बाहेर आलेलेच बरे.

I wonder why people are so against sharing, similar to Wikipedia using Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 Unported License (CC BY-SA) and the GNU Free Documentation License (GFDL)

Wikipedia content can be copied, modified, and redistributed if and only if the copied version is made available on the same terms to others and acknowledgment of the authors of the Wikipedia article used is included (a link back to the article is generally thought to satisfy the attribution requirement…..(verbatim from Wikipedia)

व्यक्तिशः माझ्या मते लेखकाचे नाव (नक्कीच) आणि लिंक दोन्ही द्यावे. जमले तर CC BY-SA वगैरे लायसन्सचा उल्लेख पण करावा. व्हॉटसॅपमध्ये शेअर करताना लिंक देणे जमत नसेल, तरी नाव तरी नक्कीच द्यायला हवे, याबद्दल दुमत नसावे.

याच विषयाशी संबंधित अधिक माहितीसाठी: The Right to Read by Richard Stallman

कॉपीराईटच्या अट्टाहासाने काय होते, याचे केवळ १ उदाहरण. रॉबर्ट फ्रॉस्ट ची ही कविता ७५ वर्षांनी पब्लिक डोमेनमध्ये आली असती, पण यशस्वी (विशेषतः वॉल्ट डिस्नी सारख्या कंपन्यांच्या) लॉबिंगमुळे कॉपीराईट अजून २० वर्षे वाढवण्यात आला.

‘Stopping by Woods on a Snowy Evening’ is part of a huge cache of copyrighted works entering the public domain on New Year’s Day.

<<< पुस्तक परिचय पध्दती च्या लेखात जर ७-८ वाक्ये लेखकाच्या नावसाहित उद्धृत करायची असतील, लेखाचे मानधन नसेल, तर >>>

माझ्या मतानुसार काही प्रॉब्लेम नाही. उदा. नुकताच मिपावर १ लेख आला आहे ज्यात जयंत नारळीकर यांच्या पुस्तकाचा परिचय करून दिला आहे. काही वाक्ये वापरणे हा ‘fair use’ आहे. शिवाय तुम्ही हौसेसाठी आणि पैसे न घेता लेखन करत असाल तर काहीच प्रश्न नसावा.

याउप्पर कुणी प्रताधिकाराचा बागुलबुवा दाखवून नकार देत असेल त्यांना सरळ खड्ड्यात जा म्हणून सांगावे आणि दुसरा संदर्भ वापरून लिहावे. आता जगात भरपूर माहिती फुकटात (प्रताधिकारमुक्त ) आणि सहज उपलब्ध आहे. अनेकजण ही माहिती फुकटात लिहितात. स्वतः:चा फायदा व्हावा म्हणून कॉपीराईटचा गैरवापर करणारे मुख्यत: प्रकाशक आणि मिडीया कंपनीच असतात. मुळात लक्षात घेतले पाहिजे की पुस्तके आणि वर्तमानपत्रे विकून फायदा होत नाही, छपाईचा खर्चपण निघत नसेल. फायदा होतो तो जाहिरातबाजीमुळे आणि मार्केटिंगमुळे.

थोडक्यात, आंतरजालावर एकदा लेखन केले की त्याची चोरी होणार नाही याची कुणीच खात्री देऊ शकत नाही. म्हणून, लेखकाने आंतरजालावर लिहिलेले लेखन स्वतःहून Creative Commons वापरून उदार मनाने इतरांबरोबर शेअर करणे जास्त चांगले ठरेल. लेखकाने स्वतःच जर CC BY-SA किंवा GFDL सारखे लायसन्स वापरून शेअर केले तर स्वतःचे नाव आंतरजालावर बघायची खाज पण भागेल आणि इतरांना पण ते शेअर करायला अडचण येणार नाही. मात्र लायसन्सनुसार लेखकाला क्रेडिट द्यायलाच पाहिजे. (नाव, लिंक वगैरे) याबाबतीत माझा प्रेफरन्स वर लिहिला आहे.

संदर्भ

This entry was posted in मनातलं. Bookmark the permalink.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.