पर्यावरणप्रेमी

संदर्भः
https://www.maayboli.com/node/79236?page=3
https://www.maayboli.com/node/79221

पर्यावरणप्रेमींची मला नेहमी गंमत वाटते. आपली सुंदर पृथ्वी वाचवा, तिचा ऱ्हास वाचवा, पर्यावरण वाचवा असा विचार नेहमी पुढे येत असतो. यात चुकीचे काही नाही, पण महत्वाची बाब म्हणजे यात निसर्गाबद्दलचे प्रेम खरं तर दुय्यम असते, खरी चिंता असते की पुढच्या पिढीचं काय होईल, मानव जातीचं काय होईल, आपण नष्ट तर होणार नाही ना? स्पष्ट सांगायचे तर निसर्ग सुप्रीम आहे आणि आपण मानव समाज त्याला ओरबाडत आहोत. We are children of the nature, but pests on this planet. योग्य वेळ आली निसर्ग ताकद दाखवेलच, आपण नष्ट होऊ, पण ही पृथ्वी तशीच आनंदात राहील.

@जिज्ञासा, तूर्तास हा व्हिडीओ(0) बघा.

<< आपल्याला अजूनही पर्यावरण वाचवा किंवा माणूस वाचवा असा either or choice आहे असं वाटतं. तुम्ही निसर्ग वाचवा माणूस आपोआप वाचेल. >>

खरं सांगतो, या पर्यावरणनाझींमुळे रोज माझ्या छातीत धडधडते. का माहीत आहे का? रोज संडासला गेलो की मी विचारात पडतो “टॉयलेट पेपर वापरू की पाणी वापरू?” दोन्हीपैकी काहीही वापरले तरी लगेच ते माझ्या मागे लागायचे की तुम्ही पर्यावरणाचा विनाश करताय म्हणून.

कागद बनवायला सारखी झाडे तोडून टाकताय, जंगलांचा संहार करताय असे सारखे म्हणत असतात हे. इतक्या पेपर कंपन्या जगात आहेत, त्या काय मूर्ख आहेत का जगातली सगळी जंगले तोडून टाकायला? जंगले संपली तर पेपर कसा बनवणार? पण गंमत म्हणजे त्यांना हे माहीत नसते की पेपर बनवण्यासाठी प्रत्यक्षात झाडांची लागवड केली जाते, अगदी शेती केल्यासारखी.(1) दुसरी गंमत म्हणजे गेल्या काही वर्षात (१९८२ च्या तुलनेत) जगातील झाडांची संख्या कमी न होता, उलट खरंतर वाढत आहे.(2) अर्थात फक्त झाडांची संख्या वाढत आहे, इतकेच आपण बघता कामा नये. ती का वाढत आहेत, त्याने बायो-डायव्हर्सिटीवर (फले, फुले, पक्षी, प्राणी वगैरे) काय परिणाम होत आहेत, हे पण बघितले पाहिजे.

पण निसर्ग खरोखर कमालीचा आहे. रेडिएशन मुळे अजून कित्येक वर्षे माणूस राहू शकणार नाही, अश्या चेर्नोबिलमध्ये आता अनेक वन्य प्राणी परतले आहेत, वनस्पती वाढत आहेत.(3) इतकंच कशाला, निसर्ग पण बदलला आणि ओझोन लेअर भरून निघाला.(4) आता त्या ओझोन लेअर बद्दल पण वादावादी आहे की CFC बंदी घातल्याने ओझोन लेअर चांगला झाला की उत्तर ध्रुवावरील हवा बदलामुळे.

पण कुणी काही शंका घेतली तर मात्र ते चालत नाही पर्यावरणप्रेमींना. काही फिजिसिस्टच्या मते “ग्लोबल वॉर्मिंग” हे pseudoscience(5) आहे.(6)(7) पण ग्लोबल वॉर्मिंगला आता कल्टचे रूप आले आहे, तो एक धर्म झाला आहे. त्यामुळे त्याच्यावर शंका कशी घेता, असे बर्‍याच जणांचे मत असते.

विज्ञान म्हटले की शंका या घेतल्या जाणारच. त्यातून एखादी थियरी ताऊन सुलाखून निघाली, थियरीने काढलेले निष्कर्श आणि मॉडेलने मांडलेले अंदाज प्रत्यक्षात पडताळून आले, इतरांना देखील तसेच रिझल्ट मिळाले की तेव्हाच ते pseudoscience न समजले जाता, खरेखुरे विज्ञान समजले जाईल.(8) “ग्लोबल वॉर्मिंग” नक्की खरे असू शकेल आणि त्याच्यासाठी मानव जबाबदार असेल किंवा नसेल, पण त्यामुळे फक्त ५०-१०० वर्षांचा पर्यावरणाचा अभ्यास करून “ग्लोबल वॉर्मिंग”चा निश्कर्ष माझ्या मते तरी घाईघाईत काढलेला वाटतो.

I can live with doubt and uncertainty and not knowing. I think it’s much more interesting to live not knowing than to have answers which might be wrong. I have approximate answers and possible beliefs and different degrees of certainty about different things but I’m not absolutely sure of anything and there are many things I don’t know anything about such as whether it means anything to ask why we’re here and what the questions might mean I might think about it little but if I can’t figure it out then I go to something else. But I don’t have to know an answer. I don’t feel frightened by not knowing things, by being lost in the mysterious universe without having any purpose which is the way it really is as far as I can tell possibly. It doesn’t frighten me.” – Richard Feynman(9)

(0) George Carlin on The Environment https://www.youtube.com/watch?v=EjmtSkl53h4

(1) https://www.tgwint.com/dispelling-myths-three-common-misconceptions-paper-industry/

(2) https://reason.com/2018/09/04/global-tree-cover-has-expanded-more-than/

(3) Wildlife Takeover: How Animals Reclaimed Chernobyl https://youtu.be/XaUNhqnpiOE

(4) https://www.indiatimes.com/technology/science-and-future/earth-finally-fixed-largest-ozone-layer-hole-above-arctic-healing-1-million-square-km-511794.html

(5) Richard Feynman on Pseudoscience https://youtu.be/tWr39Q9vBgo

(6) Physics Nobel Laureate; “Man Made” Global Warming is Pseudoscience https://youtu.be/7mGSVsl-ing

(7) Global Warming: Fact or Fiction? Featuring Physicists Willie Soon and Elliott D. Bloom https://youtu.be/1zrejG-WI3U

(8) Feynman on the Scientific Method https://youtu.be/j9p8p29P_UU

(9) Feynman – Living with Doubt https://youtu.be/czcv4b6rKgk

This entry was posted in मनातलं and tagged . Bookmark the permalink.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.