QSL cards आणि जुन्या आठवणी

मायबोलीवरचा हा लेख वाचून जुन्या आठवणी जाग्या झाल्या. शाळेत असताना मी शॉर्ट वेव्ह रेडिओवर वेगवेगळी स्टेशन्स ऐकून मग त्यांना QSL card पाठवत असे आणि त्यांच्याकडून मग उत्तर येत असे, ती कार्ड जमा करत असे. QSL card म्हणजे एका पोस्टकार्डवर माहिती लिहायची कुठला कार्यक्रम कुठल्या frequency वर कधी ऐकला, हवामान कसे होते, रिसेप्शन कसे होते वगैरे. रेडिओ स्टेशनना त्यामुळे कळत असे की आपले श्रोते कुठे आहेत आणि रिसेप्शन कसे आहे. नेव्ही नगरमध्ये एक मित्र राहायचा जो मासिक छापायचा ज्यात वेगवेगळ्या रेडिओ स्टेशन्सच्या फ्रिक्वेंसी छापलेल्या असत, कफ परेड ला पारीख नावाचा मित्र होता त्याच्याकडे डिजिटल आकडे असलेला रेडिओ होता त्याच्यामुळे बरोबर ट्यूनिंग करता येत असे, पण प्रत्यक्ष ट्रान्समिशन कधी कधी जवळच्या फ्रिक्वेंसीवर मिळत असे, मग ते QSL card मध्ये लिहायचो. परदेशी पोस्टाचा खर्च परवडत नसे, त्यामुळे ते कार्ड भारतातच consulate मध्ये पाठवायचे, अशी मजा होती. त्यातूनच पुढे मग हॅम रेडिओची आवड निर्माण झाली.
असो, अवांतर झाले.

This entry was posted in मनातलं. Bookmark the permalink.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.