स्वमग्नता

आत्ताच ऐसीअक्षरेवर स्वमग्नता एकलकोंडेकर या लेखिकेचा लेख वाचला आणि मग तिने लिहिलेले सगळे लेख वाचले. लेखिकेने ऑटिझम, म्हणजे स्वमग्नता या विषयावर लेख लिहिले आहेत. तिचा मुलगा हा स्वमग्न आहे. लेख चांगले माहितीपूर्ण आहेत. प्रतिक्रियांमध्ये लोकांनी तिचे कौतुक केले आहे. पण माझे विचार इतरांपेक्षा जरा वेगळे आहेत.

सर्वप्रथम माझ्या लक्षात आले की या लेखिकेने स्वमग्नता या एकाच विषयावर ९ लेख लिहिले आहेत. बाकी कशावरही १ ओळसुद्धा लिहिली नाही. “मी Mother Warrior आहे.” असे ती म्हणते.

तिच्या मुलाला स्वमग्नता आहे. ही नक्कीच वाईट गोष्ट आहे. But it is fait accompli. त्यामुळे तिला सहानुभुती दाखवण्याखेरीज आम्ही काय करणार? माझ्या बॉसची दोन्ही मुले स्वमग्न आहेत, पण तो कधीही तसे जाणवू देत नाही. मग लेखिकेचा मुलगा त्यांच्यापेक्षा काही फार वेगळा नाहीये. आणि स्वमग्नतेबद्दल ९ लेख ऐसीअक्षरेवर लिहिण्याचा हेतू मला काही कळला नाही. उद्या “अंध लोकांनी त्यांच्या रोजच्या जीवनात इंटरनेट कसे वापरावे ” असे लेख मी जर अंध लोकांच्या फोरमवर लिहिले तर एकवेळ लोक समजून घेतील, पण असे ९ लेख ऐसीअक्षरेवर लिहिले तर त्याला काही अर्थ आहे का? त्यामुळे मलातरी एकंदरीत हा स्वकौतुक करण्याचा प्रकार वाटला.

Posted in मनातलं | 1 Comment

घर

आत्ताच माझ्या घराचे उरलेले लोन फेडून परत आलो. आता खूप बरे वाटत आहे कारण आता घर स्वतःचे, पूर्ण मालकीचे झाले आहे. हा आनंद काही औरच आहे. पण हे काही माझे पहिले घर नाही.

खरं सांगू का? मी आयुष्यात पहिल्यांदा घर घेतलं ना, तेव्हा मला जितका आनंद झाला, तितका नंतर कधीच झाला नाही आणि कदाचित पुन्हा कधी होणारही नाही. त्याला कारण पण तसंच आहे. मी बाबांना सांगूनसुद्धा त्यांनी स्वतः घर घेतले नाही. आणि माझी नोकरी होती फिरतीची. मग मी स्वतःसाठी तरी घर कसं काय बघणार? बाबांना सांगितलं की तुम्ही घेत नाही तर मलातरी पैसे द्याल का? तर कुरकूर करत, फारतर १ लाख देईन म्हणाले. माझ्या मामाने सांगितलं की गोरेगावला त्याच्या सोसायटीत १ रूम किचन ६ लाखात आहे. त्या माणसाला गरज आहे, म्हणून त्याने किंमत कमी लावली आहे, तू नक्की घे. पण तेव्हा माझं वय होतं फक्त २३. खिशात दमडी नाही, घर घेणार तरी कुठून? मुंबईत अगदी चाळीत जागा घ्यायला पण त्याकाळी ४-५ लाख तरी लागत.

मी मनाशी ठरवलं की काहीही झालं तरी मी ५ वर्षाच्या आत स्वतःची जागा घेणार. त्याप्रमाणे मी पैसे साठवायला सुरुवात केली. त्याकाळी माझा पगार इतरांच्या मानाने चांगला होता (महिना ३.५ हजार) शिवाय नशीबाने पण साथ दिली म्हणून मी स्टॉक मार्केटमध्ये थोडे कमवले नी ३ वर्षात ५० हजार जमा केले. त्याकाळी एच.डी.एफ.सी.ने घरासाठी लोन द्यायला नुकतीच सुरुवात केली होती. त्यांच्याकडे गेलो, तर ते म्हणाले की आम्ही तुला २ लाख १० हजाराचे कर्ज देऊ. म्हणजे माझं बजेट होतं फार-फार तर ४ लाख. नशीबाने साथ मिळाली म्हणून जागा घेता आली. पण ३५०० रुपये महिना पगार असताना २७०८ रुपये दर महिना हप्ता देऊन घेतलेले घर म्हणजे माझ्या आयुष्यातली माझी सर्वात मोठी कमाई. कर्ज फेडून ते घर पूर्णपणे माझ्या हक्काचे झाले, तेव्हा जेव्हडा आनंद मला झाला, तेव्हडा आयुष्यात पुन्हा कधी होईल, याची शक्यता फार थोडी आहे.

Posted in मनातलं | Leave a comment

ऐसी अक्षरे

चर्चेला येणार्‍या कुठल्याही विषयावर स्वतःचे मत असणे, साधारणपणे गंभीर (सिरियस) विषयांवर तावातावाने काथ्याकूट करणे, आपल्या मताविरुद्ध कोणी मतप्रदर्शन केले की विदा मागणे, सरळ-सोप्या भाषेत बोलण्याऐवजी क्लिष्ट भाषेत बोलणे हा ऐसीचा यूएसपी आहे, असे मला वाटते. ऐसीवर साधारणतः “आर्मचेअर फिलॉसॉफर्सचा” वावर जास्त दिसतो (असे माझे मत आहे).

मिपावर ऐसीपेक्षा अधिक हलके-फुलके वातावरण आहे, असे मला वाटते. अर्थात ऐसीने दुसरे मिपा व्हायची गरज नाही, गंभीर चर्चा हा ऐसीचा “ब्रँड” होऊ शकतो. एका हाताला “कॉलेज कट्टा टाईप मिपा” आणि दुसर्‍या हाताला “मराठी विकिपिडिया” याच्या मधली जागा ऐसी घेऊ शकेल. वर मी म्हणालो त्याप्रमाणे यूएसपी ठेवायचा असेल तर ऐसी इस ऑन राईट ट्रॅक.

ऐसीवर मला आवडणारी सदरे म्हणजे छायाचित्रण पाक्षिक-आव्हान, मुलाखती, ही बातमी समजली का?, अलीकडे काय पाहिलंत, सध्या काय ऐकताय/ ऐकलत?, माहितीचे लेख (चंद्रशेखर, प्रभाकर नानावटी यांचे लेख) इ.

Posted in मनातलं | Leave a comment

गुंतवणूकीबद्दल माझे विचार

१. गुंतवणूक करण्यासाठी भांडवल लागते. जर तुमच्याकडे excess money (बचत) असेल तरच हे शक्य होणार. त्यासाठी काय करावे लागेल? उत्पन्न वाढवावे लागेल किंवा खर्च कमी करावा लागेल. (दोन्ही झाले तर सोन्याहून पिवळे).
२. आयुष्यातली सगळ्यात महत्वाची गुंतवणूक तुम्ही स्वतःमध्ये केली पाहिजे. ती कशी काय? चांगली तब्बेत सांभाळून (सर सलामत तो पगडी पचास) आणि चांगले शिक्षण घेऊन (ज्यामुळे भविष्यातील गुंतवणूक करण्यासाठी, तुम्ही चांगला कॅशफ्लो निर्माण करू शकता). पैसे जास्त कसे मिळतील, याचा विचार करताना बरेच दिसतात, पण आपले शरीर (फुकटात) मिळाले आहे ना, म्हणून त्याच्याकडे पार दुर्लक्ष केलेले पण दिसतात.
३. स्वतःची रिस्क प्रोफाइल ओळखणे महत्वाचे आणि त्याप्रमाणे प्लॅनिंग महत्वाचे आहे. कुणाचा व्यवसाय करण्याकडे कल असतो तर कुणाचा नोकरी करण्याकडे. कुणाला जास्त-रिस्क-जास्त-परतावा (high risk, high returns) हवा असतो, तर कुणाला सेफ गुंतवणूक हवी असते. पैशाची गरज कधी आहे, त्याप्रमाणे पण रिस्क प्रोफाइल बदलते. (शिक्षण, लग्न, जागेची खरेदी यासाठी १-२ वर्षात पैसे लागणार असतील, तर कमी जोखमीची गुंतवणूक लागते.) वयाप्रमाणेसुद्धा रिस्क प्रोफाइल बदलते.
४. चांगला गुंतवणूकीचा प्लॅन हा छोट्या-छोट्या पावलांनी बनत जातो. सुरुवात तर करा.
५. चक्रवाढ व्याज ही अतिशय सुंदर गोष्ट आहे. (Compound interest is a beautiful thing.) त्याची माहिती करून घ्या. बचत करण्याची सवय आयुष्यात लवकर लागली, तर पुढे त्याचा खूप फायदा होतो.
६. त्यानंतर अ‍ॅसेट अ‍ॅलोकेशनची माहिती करून घ्या. गुंतवणुकीत diversification का जरुरी आहे, ते समजून घ्या.
५. गुंतवणुकीत long term view लक्षात घ्या. ही १०० मिटर्सची धावदौड नाही, तर २६ मैलांची मॅरॅथॉन आहे, हे लक्षात असू द्या. Getting there is half the fun.
६. Quality of life is just as essential as a quality portfolio. A fine wine with dinner is just as important as the dinner itself.
७. पैसा कमवून झाला तरी त्याचा कुटुंबियांबरोबर, मित्रमैत्रीणींबरोबर उपभोग घ्या, त्यातून आनंद मिळवा. No one ever said on his deathbed, “I wish I spent more time in the office”.

Posted in अर्थशास्त्र, गुंतवणूक | Leave a comment

फंडामेंटल अनालिसिस

सर्वप्रथम जे माझे पूर्वग्रह आहेत ते सांगणे योग्य होईल.
१. मुद्दल सुरक्षित ठेवणे, हे माझे मूळ ध्येय आहे. वॉरन बफेच्या शब्दात सांगायचे तर Always follow 2 rules: 1. Never lose money 2. Never forget rule 1.
२. गुंतवणूक करताना मी कधीही कोणावरही विश्वास टाकत नाही. इतर काय म्हणतील ते मी ऐकतो, पण निर्णय मात्र स्वत:चाच घेतो.
३. माझा स्टॉक ब्रोकर्सवर विश्वास नाही.
४. आर्थिक सल्लागार वापरायची वेळ येते, तेव्हा मी प्रथम conflict of interest बघतो आणि fee-only सल्लागाराचा सल्ला घेतो. ( fee-only म्हणजे ज्याला कमिशन मिळत नाही, फक्त माझ्याकडून फी मिळते.)
५. एखादा स्टॉक कितीही सेक्सी वाटला तरीही जर कंपनी नफ्यात नसेल तर मी त्या कंपनीत शेअर्स घेत नाही.
६. स्टॉक घेतो तेव्हा मी ठराविक रक्कमच गुंतवतो. स्टॉक वाढला तर, अरेरे, जरा अजून टाकायला हवे होते असे वाटत नाही, पण स्टॉक पडला तर दुःखही होत नाही.
७. I like the game of investments and I play it to win.

माझा स्टॉक ब्रोकर्सवर विश्वास का नाही?
१. आपल्या पैशाची काळजी आपल्याशिवाय कोणीही घेत नाही.
२. स्टॉक ब्रोकरचा दृष्टीकोन हा कमी पल्ल्याचा (short term view) असतो.
३. ब्रोकर्स बहुतेक करून टिप्स वरून सल्ला देतात, ज्या बहुतेक खोट्या असतात. जर ती बातमी खरी असेल तर तो तुम्हाला कशाला सांगायला येईल? स्वत:च पैसे टाकून अजून कमवेल ना?
४. या वरून पुढचा मुद्दा येतो की ब्रोकर्स किंवा आर्थिक सल्लागार यांनी त्यांचा स्वत:चा पैसा त्यात लावलेला नसतो, तर फुकट फौजदारी करायला त्यांचे काय जाते? They get paid irrespective of whether you make money or not.
५. ब्रोकर्सना काही शेअर विकायचे असतील म्हणून सुद्धा ते एखादी कंपनी चांगली आहे असे म्हणू शकतात. (Pump and dump) आपण स्वत:चे डोके वापरायला नको का?

फंडामेंटल अनालिसिस चे महत्वाचे तत्व म्हणजे केवळ whim वर कोणताही शेअर घेऊ नये, पूर्ण माहिती विचारात घेउन, मनाची खात्री झाल्यावरच शेअर विकत घ्यावा. Fundamental analysis takes time, patience and determination.

आता कुठली माहिती विचारात घ्यायची?
१. इकॉनॉमीची परिस्थिती
२. सेक्टर आणि त्यातील माहिती
३. सगळ्यात महत्वाचे म्हणजे कंपनीची माहिती: management, कंपनीचा परफोर्मन्स, सेल्स आणी  प्रोडक्ट्स, competitive advantage (moat)

माहिती कुठून मिळवायची? Govt sites like SEBI or SEC, कंपनीची वेबसाइट (उदा. L&T )
– company annual report
– income statement
– balance sheet
– cash flow statement
– profit and loss statement

आता इतकी माहिती कोण वाचणार? मला कुठे वेळ आहे ही झंझट करायला, असा विचार तुमच्या मनात येणं साहजिक आहे.
Nobody said that making money was easy. If that were true, majority would be millionaires. It takes effort to make money.

पण आपण ही प्रोसेस सोपी करू शकतो. ती कशी काय?
– कुठल्या सेक्टरमध्ये पैसे गुंतवायचे ते ठरवा.
– रिपोर्ट थेट गव्हर्मेंट वेबसाईटवरून किंवा कंपनीच्या वेबसाईटवरून वाचा, ब्रोकरच्या न्यूजलेटरमधून नाही. मुख्य म्हणजे कंपनी रिपोर्टमध्ये रिस्क फॅक्टरबद्दल वाचा. Risk also comes from not knowing what you are doing.
– Study reports from companies WHO HAVE NO CONFLICT OF INTEREST उदा. पब्लीशिंग कंपनी Valueline. They don’t sell any other services related to stock market, but again, you can’t depend on them 100%.
– रेशिओजचा अभ्यास करा आणि काही ठोकताळे वापरा. (Study ratios and develop your thumb rules).
– स्टॉक स्क्रीनर वापरून तुमच्या आवडीचे स्टॉक शोधा. माझ्या क्रायटेरियानुसार अंदाजे २०० स्टॉक शॉर्टलिस्ट होतात.
– नंतर ही स्टॉकची लिस्ट २०० वरून अंदाजे ३० पर्यंत कमी करा म्हणजे त्या ३० च स्टॉकचा अभ्यास करणे सोपे पडेल. (३० हा माझा ठोकताळा आहे, तुमचा अंदाज वेगळा असू शकेल).

कुठले रेशियो (ratios) बघायचे?: (ही माहिती याहू किंवा गूगल किंवा रॉयटर सारख्या कंपनीकडून मिळू शकते.)

P/E
forward P/E
PEG
P/B
P/S
EPS growth
Current Ratio
Total Debt/assets
Total Debt/equity
ROE (Return on equity)
ROA (Return on assets)
ROI (Return of investment)
Gross Profit margin %
Net Profit margin %
Operating margin %
Sales growth %
Net income growth %
EPS growth %
Also watch for (although they mean little to me personally):
Institutional % held
Insider buying and selling
Dividend yield & stock buybacks
If you want to combine market timing with fundamental analysis, then monitor

– 52 week price range
– 52 week high value and low value
– Moving average (30 day, 60 day etc)

The best time to buy a share is when there is blood on the street. Be greedy when others are fearful and be fearful when others are greedy. The key is not to overpay for a stock. The lower the price than its intrinsic value, the better is profit potential.

खालील गोष्टी लक्षात ठेवा:
– Just because a stock is fundamentally cheap doesn’t mean it will soar in near future, in fact, it may become even cheaper. You cannot time the market.
– Fundamental analysis cannot predict future. Financial statements are backward looking, meaning they tell you how a company did in the past, not necessarily how it will do in future and how consistently.
– Fundamental analysis consider the financial statements somewhat at their face value. So it cannot protect you from fraud. उदा. सत्यम (बघा https://en.wikipedia.org/wiki/Accounting_scandals and https://en.wikipedia.org/wiki/Securities_fraud )
– If your portfolio size is small, you may be better of investing in market tracking index funds having ultra-low expense ratios.

ता.क. हा कायदेशीर किंवा टॅक्स सल्ला समजू नये.

Posted in अर्थशास्त्र, गुंतवणूक | Leave a comment

एस्पेरांतोः अस्तंगत होत असलेली जागतिक भाषा

कॉलेज शिक्षण झाल्यावर मी एस्पेरांतो शिकण्याचा प्रयत्न केला होता. मला आठवतयं की त्याचे ऑफिस कलकत्ता किंवा पुण्याला होते. तिथे पत्र पाठवून पुस्तक मागवले. तेव्हा दादरला १ गृहस्थ राहायचे, ज्यांना एस्पेरांतो बोलता येत असे, तिथे मी ३-४ वेळा जाऊन आलो. (खूपसे शब्द ‘ओ’ने संपायचे, मला बोंगाली शिकतोय की काय असं वाटायचं). पण मराठी/इंग्रजी => एस्पेरांतो => मराठी असं translation करण्यातच माझा जास्त वेळ जायचा. मनात आलं, जर भाषेचा मूळ उद्देश माझे विचार तुमच्यापर्यंत पोचवणे हा आहे, तर हा इतका खटाटोप का?

शिवाय तेव्हा माझ्याशी एस्पेरांतो बोलायला अजून कोणी न्हवते. एस्पेरांतोचा मला आयुष्यात काही उपयोग होईल का, अशी शंका आली. त्यामुळे मी चक्क प्रोग्रामींगची भाषा शिकायला लागलो. (याचा अजून १ फायदा म्हणजे चूक झाली की कॉम्प्यूटर लगेच चूक झाली आहे, हे सांगायचा पण). छोटेछोटे प्रोग्राम लिहून ते चालले, की अजून थोडा उत्साह पण यायचा.

हौस म्हणून भाषा शिकण्याचा प्रयत्न करून झाला, त्यातून भलतेच शिकलो. (पण ज्याचा मला आनंद मिळाला). माझे स्पष्ट मत आहे की भाषेचा मूळ उद्देश म्ह्णजे इतरांबरोबर विचारांची देवाणघेवाण (communication with others). त्यासाठी विशिष्ट भाषा दोघांना यायलाच हवी असं काही नाही. दुसरं म्हणजे आयुष्यात पुढे त्या भाषेचा काय उपयोग आहे का? त्यामुळे यापुढे शिकायचेच झाले, तर मी स्पॅनिश किंवा चायनीज शिकेन; संस्कृत किंवा एस्पेरांतो नाही.

Posted in मनातलं | Tagged | Leave a comment

“मिसळपाव”वरचा क्लिंटन

आज खूप दिवसांनी क्लिंटन दिसला मिसळपावच्या हॉटेलात. चांगले लेख लिहितो तो. मला त्याचं लिखाण आवडतं. गंमत म्हणजे मी मृत्युंजयच्या खरडवहीत डोकावलं, तर क्लिंटनने पण लिहिलं होतं की आज खूप दिवसांनी जुना मेंबर उपाशी बोका दिसला. बरोबर आहे, माझा बिल्ला नंबर ७ आहे मिपावर. पण मी तिथे फारसे लिहित नाही कारण तिथे खूप कंपूबाजी आणि धांगडधिंगा आहे (वाचतो मात्र रोज). मध्यंतरी विचार केला होता, आता जरा काहीतरी लिहूया. त्यातल्या त्यात “ऐसी अक्षरे” बरे वाटले, पण तिथे पण कंपूबाजी आहे. जाऊ दे, आता बहुधा इथेच लिहिलेले काय वाईट?

Posted in मनातलं | Leave a comment

रिवर्स मॉर्टगेज

रिवर्स मॉर्टगेज म्हणजे काय?
Sort of Home equity line of credit (HELOC)
Keep in mind that reverse mortgages are sold, not purchased.

कोणाला घेता येते?
– वय ६२ किंवा अधिक
– स्वतःचे घर, Primary residence only
– घरात इक्विटी हवी

रिवर्स मॉर्टगेजचे फायदे काय?
– घरात असलेली इक्विटी वापरता येते. easy access to money
– HUD/FHA चा आधार. जर लेंडर पैसे देऊ शकला नाही तर HUD/FHA पैसे देईल अशी तरतूद.
– ज्यांच्याकडे खूप इक्विटी आहे, पण सध्याचे वार्षिक उत्पन्न कमी आहे, अशांसाठी सोईस्कर.

रिवर्स मॉर्टगेजचे तोटे काय?
– समजण्यास कठीण प्रॉडक्ट.
– खूप महाग. अनेक फीज (बहुतेक लपलेल्या) उदा.ओरिजीनेशन फी (२% पहिल्या $२००,००० साठी, जास्तीत जास्त $६००० पर्यंत) टायटल पॉलिसी, सर्व्हे, लीगल, रेकॉर्डिंग फी, प्रत्येक महिन्याची लोन सर्व्हिसींग फी. या सगळ्या फी रोलओव्हर करून दाखवल्या जातात ज्यामुळे out-of-pocket खूप कमी दिसते, पण आज न उद्या ते आपल्यालाच भरावे लागते.
– कंव्हेंनशनल लोनपेक्षा रिवर्स मॉर्टगेजचा व्याज दर जास्त.
– लागू असलेले व्याज मुद्दलात जमा होते त्यामुळे व्याजावर व्याज जमा होऊन लोन वाढते.
– लागू असलेले व्याज tax deductible नाही कारण ते दर वर्षी paid नसते, ते लोनमध्ये जमा होते.
– As per FHA guidelines, HELOC + other liens cannot exceed 80% of home’s appraised value. (LTV <= 80% ) रिवर्स मॉर्टगेजच्या बाबतीत असा काही नियम आहे की नाही, याबद्दल नक्की खात्री नाही, पण असेल तर आश्चर्य वाटणार नाही.

चांगला पर्याय काय?
घरातील इक्विटी शक्यतो वापरू नये. अगदीच उपाय नसेल तर HELOC वापरावी. HELOC चे दिलेले व्याज tax deductible असते.

इक्विटी म्हणजे एखाद्या अ‍ॅसेटमध्ये आपल्या मालकीचा हिस्सा. समजा तुम्ही ५० लाखाची जागा घेतली आणी त्यावर कर्ज ३० लाख आहे, म्हणजे तुमची इक्विटी झाली ५० वजा ३० = २० लाख. तुम्ही जसे जसे कर्ज फेडत जाणार, तसे तसे कर्ज कमी कमी होऊन तुमची इक्विटी वाढत जाणार. समजा जागेची किंमत वाढली तर तुमची इक्विटी वाढणार, तसेच किंमत कमी झाली तर तुमची इक्विटी कमी होणार. जर जागेची किंमत कर्जापेक्षा कमी झाली, तर इक्विटी निगेटिव्ह पण होऊ शकते. बँकेला पॉसिटीव्ह इक्विटी हवी असते, निगेटीव्ह नको. याची खात्री करण्यासाठी ते सुरुवातीला आणी दर ५ वर्षांनी प्रॉपर्टी अप्रेजल करतात.

निवृत्त लोकांची घरात खूप इक्विटी असू शकते, पण वार्षिक उत्पन्न जर कमी असेल तर पंचाईत. घरात इक्विटी तर खूप आहे, पण त्या इक्विटीचा वापर ते करू शकत नाहीत. अशा वेळी Home Equity Line of Credit (HELOC) किंवा रिवर्स मॉर्टगेज कामाला येतात.
रिवर्स मॉर्टगेज म्हणजे इक्विटी गहाण ठेऊन काढलेले कर्ज, जे कर्जदार मरेपर्यंत किंवा त्याने घर विकेपर्यंत द्यावे लागत नाही. रिवर्स मॉर्टगेज किंवा HELOC घेतले नाही, तर मग घर विकण्याशिवाय पर्याय नसतो.

रेग्युलर मॉर्टगेजने तुम्ही इक्विटी वाढवत जाता आणि रिवर्स मॉर्टगेजने इक्विटी वापरत जाता. (निवृत्तीवेतन म्हणून किंवा आजारपणाचा खर्च म्हणून).

समजा तुमची जागा ५० लाखाची आहे आणि त्याचे अजून १० लाख कर्ज बाकी आहे.बँक तुम्हाला जागेच्या ६०% रिवर्स मॉर्टगेज द्यायला तयार आहे (३० लाख)

HELOC आणि रिवर्स मॉर्टगेज मधील फरक:
१) HELOC साठी किमान वयाची अट नाही जी रिवर्स मॉर्टगेजला असते.
२) रिवर्स मॉर्टगेजसाठी क्रेडिट किंवा उत्पन्न बघत नाहीत कारण कर्जदार मरेपर्यंत त्याला पैसे परत करावे लागत नाहीत. HELOC साठी मात्र क्रेडिट किंवा उत्पन्न पाहिले जाते.
३) HELOC साठी तुमचे पहिले कर्ज (First Mortgage) असू शकते. रिवर्स मॉर्टगेजमध्ये First Mortgage चालत नाही. जर First Mortgage असेल तर ते फेडावे लागते. समजा तुमचे घराचे शिल्लक लोन १० लाख आहे, मग बँक ते फेडते. अशावेळी मग रिवर्स मॉर्टगेज मध्ये बॅलन्स कर्ज १० लाख होते आणि तुम्ही अजून २० लाख घेउ शकता. (कमाल मर्यादा ३० लाख असेल तर). HELOC मध्ये १० लाख हे पहिले कर्ज (First Mortgage) तसेच चालू रहाते, शिवाय HELOC मधून तुम्ही ३० लाख घेउ शकता. (कसे काय? कारण HELOC + First lien हे जागेच्या ८०% पर्यंत मिळू शकते, ६०% नाही).

ही ३० लाख रक्कम दाखवली आहे, त्याला “मॅक्झिमम ड्रॉ अमाउंट” म्हणतात, म्हणजे तुम्ही जास्तीत जास्त ३० लाख कर्ज घेऊ शकता. ते कसे घेऊ शकता? रिवर्स मॉर्टगेज कर्ज मंजुरीच्या वेळी एकदम किंवा मासिक हप्त्यात किंवा जरूर पडेल तसे (५ लाख, मग २.५ लाख वगैरे)

HELOC च्या परतफेडीसाठी ठराविक मुदत असते (साधारणतः १० वर्षे). म्हणजे १० वर्षांनी घेतलेले शिल्लक कर्ज (balance loan) एकदम द्यावे लागते (याला बलून लोन असे पण म्हणतात, फुगा एकदम फुगतो तसंच काहीसं आहे म्हणून) किंवा रिफायनान्स (म्हणजे जुने लोन परतफेड करून नवीन सुरू) करावे लागते.

रिवर्स मॉर्टगेजला अशी काही अट नसते, त्यामुळे कर्जदार मरेपर्यंत किंवा घर विकेपर्यंत पैसे काढू शकतो (ड्रॉ लिमिटपर्यंत). तेव्हा मात्र ते कर्ज, जमलेल्या व्याजासकट बँकेला लगेच एक-रकमी फेडावे लागते. जर तुमचे वारसदार तसे करू शकले नाहीत, तर बँक ते घर विकून पैसे वसूल करते. (कर्जाच्या वरील उरलेले पैसे वारसांना मिळतात, पण वारसदारांमध्ये पण भांडणे असू शकतात त्यामुळे अजून कटकट होऊ शकते).

HELOC आणि रिवर्स मॉर्टगेजचे दर बहुतेक करून variable असतात (prime + margin %) हा बदलता व्याजदर महिन्या-महिन्याला बदलतो की वर्षातून एकदा ते नीट बघून घ्या. (बँका त्यात लबाडी करून, वरचेवर दर बदलता ठेऊन पैसे कमवतात). रिवर्स मॉर्टगेजचा व्याजदर साधारणतः HELOC च्या दरापेक्षा जास्त असतो. (कारण HELOC ला ठराविक मुदत असते, पण रिवर्स मॉर्टगेजला नाही, त्यामुळे बँकेला जास्त रिस्क).

HELOC चे व्याज दर महिन्याला भरावे लागते. रिवर्स मॉर्टगेजला मात्र ते लोनमध्ये जमा केले जाते, म्हणजे पुढच्या महिन्यात तुम्ही व्याजावर पण व्याज देता. पुर्वी या प्रकारामुळे लोन हे पटकन ड्रॉ लिमिटपर्यंत जायचे आणि मग बँक घर घेऊन कर्जदाराला हाकलून द्यायची. पण आता FHA ने नियम बदलले आहेत आणि कर्जदाराला मरेपर्यंत घरात राह्ता येते. (भारतात याबद्दल काय नियम आहे, ते माहित नाही).

आता तुम्हाला कळलेच असेल की बँकेच्या सेल्समनला रिवर्स मॉर्टगेज का आवडते ते?

ता.क. हा कायदेशीर किंवा टॅक्स सल्ला समजू नये.

Posted in अर्थशास्त्र | Leave a comment

माझे वाचन

तुम्ही इतकी सारी पुस्तकं का वाचता?
लहानपणापासून लागलेली आवड आणि सवय यामुळे.

काही विशिष्ट पुस्तकं वाचून त्रास होत नाही का? अशा अस्वस्थेतून तुम्ही बाहेर कसे येता? की अस्वस्थ राहणे पसंत करता?
नाही, अजिबात त्रास होत नाही.

पुस्तकं वाचणयसाठी वेळ कसा काय काढू शकता? पोटापाण्याच्या चिंता मिटल्याहेत का?
वेळ मिळत नसेल तर काढावा लागतो. रात्री उशीरापर्यंत जागून वाचन करायची सवय आहे. मी फारसा TV बघत नाही, त्यामुळे वेळ मिळतो. शिवाय मला प्रत्येक वर्षी ६ आठवडे सुट्टी मिळते, शनिवार/रविवार शिवाय २ आठवड्यांनी शुक्रवारी सुट्टी मिळते. भरपूर वेळ असतो.

आपल्या मूलभूत गरजांवर नियंत्रण ठेवता, की त्या भागवण्याइतकी संपत्ती तुमची कमावून झालिये?
हो. मुळात गरजा कमीच आहेत. मरेपर्यंत त्या पूर्ण होउनही संपत्ती उरेल, त्यामुळे ती काळजी नाही.

पुस्तकं वाचल्यानंतर त्याचं नक्की काय करता? स्वतःजवळ ठेवत असाल तर नंतर पुन्हा ती वाचून होतात का? की पुन्हा वाचनाच्या सर्क्युलेशन मध्ये यावीत म्हणून मुद्दम कुणाला वाचायला देउन टाकता, किंवा विकून टाकता?

मी DRM असलेली eBooks वाचत नाही. त्यामुळे बहुतेक वेळा कागदावरच छापलेली पुस्तके वाचतो. जर पुस्तक लायब्ररीमध्ये मिळत असेल, तर तिथून आणतो, नाहीतर विकत घेतो.

पुस्तक वाचून झाले की GoodReads मध्ये त्याचे वर्गीकरण करतो. (५ स्टार = स्वतःच्या संग्रहात ठेवण्यासारखे आणि मित्रांना भेट देण्यालायक. ४ स्टार = वाचायला चांगले. परत वाचावेसे वाटू शकेल. ३ स्टार = एकदा वाचायला ठीक. विकत घेण्यापेक्षा लायब्ररीतून आणलेले बरे. २ स्टार = बकवास. पैसे वाया गेले. १ स्टार = फुकट दिले तरी पुन्हा वाचणार नाही.)
विकत घेतलेले पुस्तक वाचून झाले, की स्वतःच्या संग्रहात ठेवण्यालायक नसेल तर लायब्ररीला देतो.

तुमच्यापैकी कुणाला आपण काही उत्तम , भरपूर कंटेंट असलेलं, अगदि स्वतंत्र पुस्तक म्हणून प्रकाशित होइल असं लिहावं असं वाटत नाही का?
वाचन आणि लेखन हे वेगवेगळे पैलू आहेत. पुस्तक लिहिता येईल इतपत ज्ञान मला कुठल्याच विषयात नाही. शिवाय लेखनाचा पिंडपण नाही. त्यामुळे स्वतःचे पुस्तक कधी प्रकाशित होईल, असे वाटत नाही.

Posted in मनातलं | Leave a comment

वैज्ञानिक दृष्टिकोन

जालावर सहज उचकपाचक करताना सापडलेला व्हिडीओ.
रिचर्ड फाइनमनबद्दल तुम्हाला बहुधा माहीत असेल. भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार याला मिळाला आहे.
वैज्ञानिक दृष्टिकोन कसा असावा, याबद्दल त्याचे मत आपल्याला कळून येते. ७:०५ मिनिटानंतर शंका घेणे का महत्वाचे आहे याबद्दल विचार आहे.

Posted in माहितीपूर्ण | Leave a comment