माझ्या ब्लॉगवरचे चित्र

मला एकाने विचारलं की या ब्लॉगवर एकट्याने चालणारा माणूस का दाखवला आहेस तू? तुला दुसरं कुठलं चित्र मिळालं नाही का? तुला ऑर्सन वेलेसच्या म्हणण्याप्रमाणे एकाकीपणा दाखवायचा आहे काय?

We’re born alone, we live alone, we die alone. Only through our love and friendship can we create the illusion for the moment that we’re not alone. – Orson Welles

खरं सांगायचं तर मला काही कधी एकाकी वाटलेलं नाही. मी नेहमी मजेत असतो, आनंदात असतो. प्रत्येक दिवस हा आजचा दिवस आयुष्यातला शेवटचा दिवस असेल असे समजून जगतो. आयुष्याच्या शेवटी काही खंत राहील असे सध्यातरी मला काही वाटत नाही. हे चित्र म्हणजे माझ्या एका आवडत्या कवितेचे प्रतीक आहे. बघा, तुम्हीपण ही कविता वाचून बघा. (द रोड नॉट टेकन, कवी रॉबर्ट फ्रॉस्ट)

The Road Not Taken

Two roads diverged in a yellow wood,
And sorry I could not travel both
And be one traveler, long I stood
And looked down one as far as I could
To where it bent in the undergrowth;

Then took the other, as just as fair,
And having perhaps the better claim
Because it was grassy and wanted wear,
Though as for that the passing there
Had worn them really about the same,

And both that morning equally lay
In leaves no step had trodden black.
Oh, I marked the first for another day!
Yet knowing how way leads on to way
I doubted if I should ever come back.

I shall be telling this with a sigh
Somewhere ages and ages hence:
Two roads diverged in a wood, and I,
I took the one less traveled by,
And that has made all the difference.

– Robert Frost

Posted in मनातलं | Leave a comment

माझी आवडती पुस्तके

माझी आवडती पुस्तके (ज्यामुळे मी व्यवसाय करायला शिकलो आणि व्यवसाय केव्हा बंद करायचा ते शिकलो आणि नवीन व्यवसाय सुरु करायला शिकलो).

1. Horse Sense: The Key to Success Is Finding a Horse to Ride by Al Ries and Jack Trout
2. The Dhandho Investor: The Low – Risk Value Method to High Returns by Mohnish Pabrai
3. Cashflow
4. If You’re Clueless about Accounting and Finance by Seth Godin
5. Buffett Beyond Value: Why Warren Buffett Looks to Growth and Management When Investing by Prem C Jain
6. Positioning: The Battle for Your Mind by Al Ries
7. The Power Of Simplicity: A Management Guide to Cutting Through the Nonsense and Doing Things Right by Jack Trout

Posted in मनातलं | Leave a comment

फेसबुक

फेसबुक सध्या किती पॉपुलर झाले आहे. लोकं येता-जाता सारखे तिथे काहीतरी खरडत असतात. मित्रांशी किंवा मैत्रिणींशी गप्पा मारायचा चांगला अड्डा आहे तो. इथे तुम्हाला तुमचे जुने मित्र किंवा मैत्रिणी शोधता येतात. पण मला तर तिचे फक्त पहिले नावचं माहित आहे आणि तिचे कॉलेज माहित आहे, मग मी तिला कसं काय शोधणार? आता त्या गोष्टीला पण २४ वर्ष झाली. म्हणजे तर जवळजवळ अशक्यच. नाही का?

Posted in मनातलं | Leave a comment

ओळख

खूप दिवस झाले ही वेबसाईट घेऊन, पण काही लेखन केले नाही. आज अचानक आठवण झाली की अरेच्चा, आपली पण साईट आहे की, जरा काही तरी लिहूया. आजपासून सुरुवात करतोय आणि आठवड्यातून एकदा तरी काही तरी लिहिण्याचा प्रयत्न करीन.

आधी माझी ओळख करून देतो. मी आहे एक सामान्य प्राणी. तुम्हाला R.K Laxman चा common man माहीत असेल ना, म्हणजे अगदी तस्साच. अंगात काही विशेष गुण नसलेला, ऑफिसात पाट्या टाकून झाल्या की पगाराची वाट बघणारा, बसमध्ये खिडकीजवळ जागा मिळाली की स्वर्ग मिळाल्याचा आनंद होणारा, वर्षातून एकदा LTA घेऊन कुठेतरी सहल करणारा आणि त्या आठवणींवर जगणारा १ जीव. रोजच्या या रहाटगाडग्यात जगताना मनात अनेक विचार येतात, पण ते सगळे कोणाला स्पष्ट असे सांगता येत नाहीत, मनातल्या खर्‍याखुर्‍या भावना जाहीर करता येत नाहीत. म्हणून हा प्रपंच.

इथे मी माझे स्पष्ट मत लिहिणार आहे. काहीही न लपवता. काही विचार तुमच्या विचारांसारखे असतील, काही नसतील. काही तुम्हाला पटतील, काही नाही पटणार. पण १ मात्र नक्की, आपल्याला विचारांची देवाणघेवाण तरी करता येईल.

फक्त १ विनंती, इथे शक्य तितके मराठीमध्ये लिहा. आणि दुसरे महत्वाचे म्हणजे, मी कोण आहे हे यदाकदाचित तुम्हाला कळले तर ते गुपित फक्त तुमच्याकडेच ठेवा. मुखवट्यामागे चेहरा कोणाचा आहे, ते कळले की स्पष्ट बोलण्यावर मर्यादा येते. धन्यवाद.

Posted in मनातलं | Leave a comment

नमस्कार

नमस्कार

Posted in मनातलं | Leave a comment