मराठीतील असभ्य म्हणी

मराठी बोलीभाषेतील लुप्त झालेल्या असभ्य म्हणी आणि वाक्प्रचार. व्यवस्थित अभ्यास करून प्रसंगी योग्य ती म्हण/ वाक्प्रचार वापरा :-
1) *लवडेलूट करणे* :- संधी मिळाली म्हणून एखाद्या पदार्थाचा भरपूर, अनावश्यक उपयोग करणे.
2) *गांड धुवून कढी आणि उरलेल्याची वडी* :- अतिशय कंजुषपणा करणे.
3) *आंडाला लोणी लावणे* :- अत्यंत नामुष्कीची खुशामत करणे.
4) *आंड तोंडात धरणे* :- लाचारीचा कळस करणे.
5) *नेसली बारा लुगडी पण बाहेर झाटा उघडी* :- विपुलतेचा उपयोग न करणे.
6) *सती जाणारी , गांड भाजते म्हणून माघारी येणार नाही* :- निश्चयी माणूस संकटांना घाबरून पराभव पत्करत नाही.
7) *गांड गुलामी* – अत्यंत हीन दास्यत्व.
8) *गांडीत बोट घालु नये, घातले तर हुंगू नये, हुंगले तर सांगू नये, सांगितले तर तिथे राहू नये* :- एखादी वाईट गोष्ट मुळातच करू नये. केली तर मुर्खपणा वाढवत जाऊ नये.
9) *मोराने पिसारा फुलविला की गांड उघडी पडते* :- नको त्या वेळी दोष उघडे पडणे.
10) *तोंडभर विडा नी गांडभर लवडा* – समृद्धी असणे.
11) *गांडीत मिर्चीची रोपे लावणे* :- छळणे.
12) *गांडीत मिर्ची फुटणे*:- आग होणे.
13) *उंटीणीच्या गांडीचा मुका घेण* :- कुवतीबाहेरचे कार्य करायला घेणे.
14) *सासरी आली, पन चूत विसरली* :- कामाचे मुख्य साधन विसरणे.
15) *रांडेला लवड्याची भिती कसली?* – सराईत माणसाला कसली अडचण येत नाही.
16) *फुकटचा फोदा आणि झव रे दादा* :- फुकटात मिळालेल्या वस्तुचा, संधीचा यथेच्छ उपभोग घेणे.
17) *फोदा इकडे, झवताय तिकड* :- बावळटपणे कार्य करणे.
18) *फुकट झवायला मिळतय तर म्हणे शेट्ट रूतत्यात* :- चांगली गोष्ट मिळाली तरी ती घेण्याला सबबी सांगणे.
19) *झाट्याची नाय पत आणि नाव गणपत* :- पोकळ रुबाब.
20) *अस्वलाला कसले आले झाटांचे ओझे?* :- समर्थ माणसाला कार्याचा भार जाणवत नाही.
21) *नागवी सवाशीण भेटण* :- अकल्पित लाभ होणे.
22) *बकरीची शेपटी ना फोदा झाके, ना माशी हाक* :- निरुपयोगी गोष्ट.
23) *मुतापूरते लिंग हाती धरावा* :- नीच माणसांशी कामापुरते संबंध ठेवावा.
24) *वाळुत मुतले, ना फेस ना पाणी* :- निर्रथक क्रिया.
25) *खरी रांड मोठ्या लवड्याला भीत नाही* :- कार्यकुशल माणुस.
26) *एक रांड आणि चार आंड* :- मागणी जास्त आणि पुरवठा कमी अशी स्थिती.
27) *झाटे धूतली म्हणून रेशीम होत नाही* :- निरूपयोगी वस्तू.

This entry was posted in मनातलं and tagged . Bookmark the permalink.

One Response to मराठीतील असभ्य म्हणी

  1. Anand says:

    Very nice. Do write more.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.