उबुंटू/लिनक्सवर गमभन प्रणाली वापरून मराठी लेखन कसे करावे?

उबंटूवर ऑफलाइन (म्हणजे ब्राउजर न वापरता) मराठी लिहायचे असेल तर मलापण हा त्रास झाला आहे.
iTrans (m17n) ही प्रणाली त्यातल्या त्यात “गमभन”च्या जवळ जाणारी आहे. बाकी इतर KaGaPa phonetic, inscript (m17n), phonetic (m17n)आणि हिंदी बोलनागरी वापरून मराठी लिहिणे खूपच कठीण आहे आणि पटपट लिहिणे तर जवळपास अशक्य आहे, विशेषतः मायबोली आणि मिसळपावसारखी “गमभन”ची सवय असेल तर.

अखेरीस उपाय मिळाला आहे, जो मी पूर्वी लिहिला होता. हिंदी itrans(m17n) पेक्षा मराठी itrans(m17n) चांगला आहे कारण त्यामुळे मराठी स्पेल चेकर वापरता येतो. (उबुन्टु २०.०४ वर)

अ‍ॅपल, बॉक्स हे शब्द नीट लिहिता येत नाहीत आणि इतर थोड्या गैरसोई आहेत (उदा. “आहे.” हा शब्द पूर्णविरामासहित लिहिला की आहe असा लिहिला जातो, I = ई पण ee <> ई, ee = ऎ ) . मी तो त्रास कमी करण्याचा प्रयत्न करणार आहे. पण एकंदरीत Marathi(itrans(m17n)) कीबोर्ड हा “गमभन”च्या ९०-९५% टक्के जवळ जाणारा आहे.

गमभन आता लिनक्सवर कसे आणायचे ते आता कळले आहे. त्याची माहिती पुढीलप्रमाणे.
$cd /usr/share/m17n
$sudo cp mr-itrans.mim mr-gamabhana.mim

मग mr-gamabhana.mim ही फाइल एडिट करा.
$sudo edit mr-gamabhana.mim (सूडो वापरणे महत्वाचे आहे. File must be owned by root.)
महत्वाचे म्हणजे पुढील बदल हवेत. (पहिली ओळ ही फक्त कॉमेंट आहे)
;; mr-gamabhana.mim — Marathi input method with ITRANS method
(input-method mr gamabhana)

तुम्हाला जमत नसेल तर मी माझी फाईल पाठवू शकेन. (अजून १००% टेस्ट केलेली नाही, पण बर्‍यापैकी बदल केले आहेत ते व्यवस्थित वाटले)
नंतर रिबूट करा.
सेटिंग्ज => रिजन्/लँग्वेज मध्ये जाऊन Marathi (gamabhana(m17n)) इंस्टॉल करा आणि मग LibreOffice Writer मध्ये लिहून बघा.

पुढील साईट उपयुक्त आहे जिचा फायदा झाला.
https://www.nongnu.org/m17n/
Read related pages => Data provided by the m17n database
Read related pages => tutorial

This entry was posted in मनातलं. Bookmark the permalink.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.