चर्चेला येणार्या कुठल्याही विषयावर स्वतःचे मत असणे, साधारणपणे गंभीर (सिरियस) विषयांवर तावातावाने काथ्याकूट करणे, आपल्या मताविरुद्ध कोणी मतप्रदर्शन केले की विदा मागणे, सरळ-सोप्या भाषेत बोलण्याऐवजी क्लिष्ट भाषेत बोलणे हा ऐसीचा यूएसपी आहे, असे मला वाटते. ऐसीवर साधारणतः “आर्मचेअर फिलॉसॉफर्सचा” वावर जास्त दिसतो (असे माझे मत आहे).
मिपावर ऐसीपेक्षा अधिक हलके-फुलके वातावरण आहे, असे मला वाटते. अर्थात ऐसीने दुसरे मिपा व्हायची गरज नाही, गंभीर चर्चा हा ऐसीचा “ब्रँड” होऊ शकतो. एका हाताला “कॉलेज कट्टा टाईप मिपा” आणि दुसर्या हाताला “मराठी विकिपिडिया” याच्या मधली जागा ऐसी घेऊ शकेल. वर मी म्हणालो त्याप्रमाणे यूएसपी ठेवायचा असेल तर ऐसी इस ऑन राईट ट्रॅक.
ऐसीवर मला आवडणारी सदरे म्हणजे छायाचित्रण पाक्षिक-आव्हान, मुलाखती, ही बातमी समजली का?, अलीकडे काय पाहिलंत, सध्या काय ऐकताय/ ऐकलत?, माहितीचे लेख (चंद्रशेखर, प्रभाकर नानावटी यांचे लेख) इ.